राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेला यांची नावे जाहीर ; प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे दिली माहिती - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, May 10, 2020

राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेला यांची नावे जाहीर ; प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे दिली माहिती


माणदेश एक्सप्रेस ऑनलाईन टीम 
आटपाडी : विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली असून माजी मंत्री व राष्ट्रवादीचे वजनदार नेते शशिकांत शिंदे व विधानसभेला राष्ट्रवादीची मुलुख मैदानी तोफ, स्टार प्रचारक अमोल मिटकरी यांना यांना उमेदवारी देण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे दिली.
शशिकांत शिंदे हे कोरेगाव या विधानसभा मतदार संघातून पराभूत झाले होते. परंतु त्यांनी लोकसभेला राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांना निवडणूक आणण्यात महत्त्वाची भुमिका बजावली होती. तसेच ते माथाडी कामगार संघटनेचे मोठे नेते आहेत. 

विधानसभेला राष्ट्रवादीकडे जयंत पाटील अजित पवार व खास. अमोल कोल्हे सोडले तर स्टार प्रचारक नव्हते नेमके याचा काळात अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादीची ही पोकळी भरून काढत राज्यामध्ये स्टार प्रचारकाची भुमिका निभावली. त्यांच्या भाषणांनी मोठ्या प्रमाणावर मतदार राष्ट्रवादीकडे वळला. त्यांनी केलेल्या भाषणांनी व आरोपामुळे भाजपवाले पुरते घायाळ झाले होते. त्यामुळे सर्वात मोठी व स्टार प्रचारक ही जमेची बाजू यामुळे अमोल मिटकरी यांना उमेदवारी देण्यात आली. 
त्यामुळे आता शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपसभापती नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, काँग्रेसकडून राजेश राठोड, पापा मोदी तर भाजप कडून प्रविण दटके, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह पाटील, डॉ. अजित गोपछडे हे उमेदवार रिंगणात  आहेत.


No comments:

Post a Comment

Advertise