Type Here to Get Search Results !

लॉकडाऊनच्या काळात ३६६ गुन्हे दाखल १९८ लोकांना अटक


माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक  गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली असून राज्यात ३६६ गुन्हे दाखल केले आहेत.अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली. 
टिकटॉक,फेसबुक, ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर  चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये  ज्या ३६ गुन्ह्यांची  नोंद झाली आहे त्यापैकी १६ गुन्हे अदखलपात्र (N.C )आहेत.
जिल्हानिहाय गुन्हे
त्यामध्ये बीड ३५,पुणे ग्रामीण २९, जळगाव २६, मुंबई २१, कोल्हापूर १६, नाशिक ग्रामीण १५, सांगली १४, ठाणे शहर १३, बुलढाणा १२, जालना १२, नाशिक शहर ११, सातारा १०, पालघर १०, लातूर १०, नांदेड १०, परभणी ८, नवी मुंबई ८, सिंधुदुर्ग ७, अमरावती ७, ठाणे ग्रामीण ७, नागपूर शहर ७, हिंगोली ६, गोंदिया ५, सोलापूर ग्रामीण ५, पुणे शहर ४, रत्नागिरी ४ ,सोलापूर शहर ४, नागपूर ग्रामीण ४, भंडारा ४, पिंपरी- चिंचवड ४, अमरावती ग्रामीण ४, चंद्रपूर ४, रायगड २, धुळे २, वाशिम २, यवतमाळ १,औरंगाबाद १ (एन.सी), यवतमाळ १ यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १५५ गुन्हे तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १४३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.Titktok विडिओ शेअर प्रकरणी १६ व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ६ गुन्हे दाखल झाले आहेत. इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ तर अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी ४२ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत १९८ आरोपींना अटक केली आहे. आक्षेपार्ह अशा  १०२  पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे. चंद्रपुर जिल्ह्यातील माजरी पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली. ज्यामुळे जिल्ह्यातील नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या ४ झाली आहे . सदर गुन्ह्यातील आरोपीने , फिर्यादीबद्दल चुकीची माहिती असलेली व धार्मिकतेचा रंग देणारी पोस्ट आपल्या फेसबुक प्रोफाईलवरून शेअर केली होती, त्यामुळे परिसरातील शांतता बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.

ऑनलाईन व्यवहारात सावध राहा
सध्या लॉकडाउनच्या काळात बरेच ज्येष्ठ नागरिकसुद्धा ऑनलाईन आर्थिक व्यवहार करत आहेत. महाराष्ट्र सायबर विभागामार्फत सर्व ज्येष्ठ व्यक्तींना आवाहन करण्यात येते की,आपण ऑनलाईन वस्तू खरेदी करताना,किंवा काही आर्थिक व्यवहार करताना सावध व सजगराहा. कोणत्याही अपरिचित वेबसाईटवर आपली सर्व माहिती विशेषतः बँक खात्याचे क्रमांक, डेबिट /क्रेडिट कार्ड पिन नंबर इत्यादी देऊ नका. जर तुम्हाला त्या वेबसाईटवरील मजकूर संशयास्पद  वाटत असेल तर आधी कोणत्याही जाणकार व्यक्तीकडून माहिती करून घ्या. तसेच सोशल मिडियावर कोणतीही पोस्ट किंवा बातमी खातरजमा केल्याशिवाय फॉरवर्ड करू नका. केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी जे नियम व आदेश प्रसिद्ध करतील त्याचे पालन करा व गरज नसल्यास कृपया घराच्या बाहेर पडू नका.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies