Type Here to Get Search Results !

पुरोगामी महाराष्ट्रासाठी पुन्हा लढण्यास सज्ज....


माणदेश एक्सप्रेस ऑनलाईन टीम 
आटपाडी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे कोरोनातुन मुक्त झाले असून ट्विट करीत पुरोगामी महाराष्ट्रासाठी पुन्हा लढण्यास सज्ज असल्याचे दाखवून दिले आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी देत असलेल्या माझ्या लढाईस यश आलेलं असून मी आज सुखरूप घरी जात आहे. यापुढे ही तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असंच राहू द्या. माझ्यावर यशस्वी उपचार करणारे फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड येथील सर्व डॉक्टर्स ,नर्सेस ,वॉर्डबॉय आणि इतर सर्व हॉस्पिटल स्टाफ यांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन त्यांना मनापासून धन्यवाद. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझी पत्नी आणि मुलगी यांच्या प्रेमाची ताकद माझ्या पाठीशी होती असं जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटद्वारे सांगितले. जितेंद्र आव्हाड यांनी अखेर कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies