अजनाळे गावात वाळूची चोरटी वाहतूक जोरात ; दिवसाढवळ्या केली जाते वाळू वाहतूक ; महसूल प्रशासनाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, May 27, 2020

अजनाळे गावात वाळूची चोरटी वाहतूक जोरात ; दिवसाढवळ्या केली जाते वाळू वाहतूक ; महसूल प्रशासनाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष


अजनाळे गावात वाळूची चोरटी वाहतूक जोरात 
दिवसाढवळ्या केली जाते वाळू वाहतूक ; महसूल प्रशासनाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
माणदेश एक्सप्रेस न्युज
अजनाळे/सचिन धांडोरे : सांगोला तालुक्यातील माण नदीपात्रातून बोंबेवाडी, चिणके, नाझरे या गावातून पिकअप, अशोक लेलंड, छोटा हत्ती व ट्रॅक्टर याच्या साह्याने अजनाळे गावामध्ये दररोज राजरोसपणे वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जात आहे. कोरोना रोगाचा प्रसार रोखण्यासाठी महसूल विभाग व पोलीस प्रशासन व्यस्त आहे याचा फायदा घेत वाळू चोरट्यांनी अजनाळे गावांमध्ये दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक करत असून या वाळू वाहतुकीला महसूल विभागाला लगाम लावण्यात अपयश येत असल्याचे चित्र सध्या अजनाळे गावांमध्ये पहावयास मिळत आहे. 
माण नदीपात्रातून चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्यांनी धुमाकूळ घातला आहे. महसूल विभागाने चोरटी वाळू वाहतूक ताबडतोब थांबवावी अशी मागणी युवा नेते समाधान धांडोरे यांच्याकडून केली जात आहे. वाळू वाहतूक करणाऱ्या वर महसूल अधिकारी व कर्मचारी यांचा कोणत्याही प्रकारचा धाक राहिला नाही. त्यामुळे गावातून तर्क-वितर्क दबक्या आवाजात ऐकायला मिळत आहे. कोरोना या संसर्गजन्य विषाणूच्या विरोधात प्रशासन विरोधात लढत असून याचा फायदा घेत वाळू चोरांनी घेतला असून यातून रग्गड कमाईतून अनेक वाळू चोर गब्बर झाल्याचे पाहावयास मिळत आहे. अजनाळे व आसपासच्या परिसरामध्ये चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्यांनी काही अधिकारी व कर्मचारी यांना हप्ते गिरीची लागन झाल्यामुळे आपल्याला कोण काही करत नाही? या अविर्भावात दिवसाढवळ्या या परिसरामध्ये चोरटी वाळू वाहतूक केली जात आहे. ही वाळू वाहतूक मध्यरात्री व पहाटेच्या सुमारास माण नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात केली जात आहे. तरी या अवैध वाळू उपसाला लगाम लावण्याची गरज आहे. तरी सदर प्रकरणी तहसीलदार योगेश खरमाटे व पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी लक्ष घालून सुरु असलेला वाळू उपसा त्वरित बंद करावा अशी मागणी होत आहे.    

No comments:

Post a Comment

Advertise