सांगली जिल्ह्यात चारजणांना कोरोनाची लागण ; सुलतानगादे, लांडगेवाडी, करुंगली आणि आंबेगाव येथील रुग्णांचा समावेश - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, May 27, 2020

सांगली जिल्ह्यात चारजणांना कोरोनाची लागण ; सुलतानगादे, लांडगेवाडी, करुंगली आणि आंबेगाव येथील रुग्णांचा समावेश


सांगली जिल्ह्यात चारजणांना कोरोनाची लागण ; सुलतानगादे, लांडगेवाडी, करुंगली आणि आंबेगाव येथील रुग्णांचा समावेश 
माणदेश एक्सप्रेस न्युज 
सांगली : आज आलेल्या अहवालानुसार चारजणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सुलतानगादे (ता.खानापूर), लांडगेवाडी (ता. कवठेमहांकाळ), करूंगली (ता. शिराळा) आणि आंबेगाव (ता. कडेगाव) येथील रूग्णांचा यात समावेश आहे. 
सुलतानगादे ता.खानापूर येथील ५७ वर्षीय महिला दिनांक २२ मे रोजी मुंबई चेंबूर येथून आली होती. तसेच करूंगली ता. शिराळा येथील ३३ वर्षीय पुरुष दि. १७ मे रोजी मुंबईहून आला होता, तर आंबेगाव ता. कडेगाव येथील ३६ वर्षीय पुरुष दि २४ मे रोजी मुंबई येथून आला होता. लांडगेवाडी ता. कवठेमहांकाळ येथील आठ वर्षीय मुलगी ही दिनांक २३ मे रोजी मुंबईहून आल्याने कम्युनिटी क्वारंटाईण मध्येच होती. या सर्वांवर मिरज येथे आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहेत.
सुलतानगादे , करंगुली व आंबेगाव येथे कंटेनमेंट झोनची कार्यवाही तसेच अन्य प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली.


No comments:

Post a Comment

Advertise