माळशिरस तालुक्यात कोरोनाचा शिरकाव : दोन पॉझीटीव्ह रुग्ण आढळले - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, May 27, 2020

माळशिरस तालुक्यात कोरोनाचा शिरकाव : दोन पॉझीटीव्ह रुग्ण आढळले


माळशिरस तालुक्यात कोरोनाचा शिरकाव : दोन पॉझीटीव्ह रुग्ण आढळले
माणदेश एक्सप्रेस न्यूज
माळशिरस/संजय हुलगे : वैराग येथे सापडलेल्या पॉझेटीव्ह कोरोना रूग्णाच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नाव आल्यामुळे संग्रामनगर-अकलूज येथील एका किराणा होलसेल व्यापाऱ्याच्या कुटुबातील ५ व्यक्तींना तपासणीसाठी उपजिल्हा रूग्णालय अकलूज येथे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी दोघां व्यक्तीचे कोरोना तपासणी अहवाल पॉझेटीव्ह आले असून तालुक्यात २ कोरोना बाधित रुग्ण झाले आहेत.
अकलूज येथील होलसेल किराणा व्यापारी त्यांच्या वैराग येथील सासरवाडीला दोन दिवसांपुर्वी गेले होते. सदर सासरवाडीतील व्यक्ती काल आरोग्य विभागास कोरोना पॉझीटीव्ह आढळून आली. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती आरोग्य विभागाने घेतली असता त्यांना अकलूज येथील व्यापाऱ्याची माहिती मिळाली. तेव्हा आरोग्य विभागाने अकलूज पोलीस, ग्रामपंचायत संग्रामनगर, तलाठी, मंडल अधिकारी, तहसिलदार यांना कळवल्यानंतर संग्रामनगर येथील सदर व्यापाऱ्याचे घर सील करण्यात आले. त्यांच्या कुटुबातील ५ व्यक्तींचा स्वॅब तपासण्यासाठी त्यांना अकलूज उपजिल्हा रूग्णालयात नेण्यात आले त्यापैकी २ व्यक्तीचे कोरोना अहवाल पॉझेटीव्ह आले आहेत.  
माळशिरस तालुका आरोग्य विभागाने अकलूज येथील व्यापाऱ्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती त्यांच्याकडून घेतली आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी अशा व्यक्तींच्या घरी जाऊन त्यांना तपासणीसाठी आणून कवारन्टाईन करून ठेवण्यात येणार आहे. तालुक्यात आता पर्यत एकही रुग्ण नव्हता. मात्र वैराग टू अकलूज कनेक्शन झाल्याने कोरोने माळशिरस तालुक्यात खाते उघडले आहे. त्यामुळे आता माळशिरसकरांच्या चिंतेत भर पडली आहे. तालुक्यात कोरोनाचा प्रदुर्भाव होऊ नये याकरिता प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. अकलुज संग्रामनगर हद्दीतील दोन जणांना कोरोनोची लागण झाली असल्याचे तपासणी अहवालात स्पष्ट झाले असल्याची माहीती उपविभागिय अधिकारी शमा पवार यांनी दिली.
माळशिरस तालुक्यातील आजच्या परिस्थितीनुसार दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तालुक्यागतील संग्रामनगर व परिसर हा कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित झालेला आहे. सदर व्यक्तींचा संपर्क तालुक्यात मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता आहे. ते शोधण्याचे कामकाज यंत्रणेमार्फत सुरू आहे.
डॉ .रामचंद्र मोहिते, तालुका आरोग्य अधिकारी, माळशिरस.

No comments:

Post a Comment

Advertise