विटा शहरास "कचरा मुक्त शहर म्हणून केंद्रशासनाकडून 3 स्टार ; स्वच्छता हा शहराचा संस्कार : ॲड वैभव सदाशिवराव पाटील - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, May 19, 2020

विटा शहरास "कचरा मुक्त शहर म्हणून केंद्रशासनाकडून 3 स्टार ; स्वच्छता हा शहराचा संस्कार : ॲड वैभव सदाशिवराव पाटील


विटा शहरास "कचरा मुक्त शहर म्हणून केंद्रशासनाकडून 3 स्टार
स्वच्छता हा शहराचा संस्कार : ॲड वैभव सदाशिवराव पाटील 
माणदेश एक्सप्रेस न्युज
विटा/प्रतिनिधी :स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत संपूर्ण विटा शहरातून शंभर टक्के कचरा संकलन यामध्ये ओला, सुका व घातक या पद्धतीने वर्गीकृत कचरा संकलन केला जात होता.कचऱ्यापासून बायोचार कंपोस्टिंग खत ते वीज निर्मिती असा नाविन्यपूर्ण प्रयोग विटा शहरांमध्ये राबवण्यात आला होता. शंभर टक्के संकलन, घंटागाडीच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापन भूमी येथे शास्त्रोक्त पद्धतीने संपूर्ण कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे.
विटेकर नागरिकांना स्वच्छतेची सवय लागावी यासाठी विटा नगरपरिषदेने जनजागृती  मोठ्या प्रमाणात भर दिला. विटा नगरपालिकेच्या वतीने जनजागृतीची विशेष टीम तयार करून या टीमच्या माध्यमातून व नगरपरिषद सर्व कर्मचारी, पदाधिकारी यांच्या माध्यमातून शहरातील सर्व सामाजिक मंडळे, संस्था, शाळा, कॉलेज यांना बरोबर घेऊन संपूर्ण विटा शहरामध्ये स्वच्छतेची लोकचळवळ उभा केली. यामध्ये 100% सिंगल युज प्लास्टिक बंदी करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणे कचरा पडणारी ठिकाणे सुशोभित करण्यात आले आहेत. तलाव स्वच्छता करुन गटारावर जाळी बसवणे त्याचबरोबर शहरांमध्ये असलेल्या सर्व मोठ्या जुन्या स्टोरीज बिन काढून ट्वीन बीन लावण्यात आलेल्या आहेत. विटेकर नागरिकांनी घरच्या घरीच सेंद्रिय खत तयार करावे यासाठी प्रोत्साहन देऊन होम कंपोस्टिंग हा उपक्रम राबवला. देशातील पहिलाच प्रयोग सोलर टवीन हा प्रकल्प विटा नगरपरिषदेने राबवला. एमआरएफ सेंटरच्या माध्यमातून गरजू लोकांना मदत करण्याचा प्रयत्न होत आहे. रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड, एफ एसटीपी प्लांट करण्यात आला आहे. त्याचबरोबर शंभर टक्के कचऱ्यावर प्रक्रिया या पद्धतीचे कामकाज विटा पालिकेने राबवले. याचबरोबर विटा शहरातील रहिवासी भागांमध्ये एक वेळ तर व्यापारी भागांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन्ही वेळी संपूर्ण साफसफाई नित्य सुरु असते. विटेकर नागरिकांचे योगदान फार महत्त्वाचे आहे यामुळे स्वच्छतेत शहर चांगली कामगीरी करु शकले असे प्रतिपादन मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी केले. 

स्वच्छता हा शहराचा संस्कार :   ॲड वैभव सदाशिवराव पाटील 
स्वच्छ भारत अभियानामध्ये विटा शहराने गेली तीन ते चार वर्षे सातत्याने प्रयत्न करून देशामध्ये अव्वल दर्जा कायम ठेवला आहे. यासाठी हर एक विटेकर नागरिकाने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे स्वच्छता हा  संस्कार आज प्रत्येकाच्या मनावर बिंबवण्यासाठी विटा नगरपालिका यशस्वी ठरली आहे विटा शहरातील प्रत्येक नागरिकाने शहर स्वच्छतेमध्ये दिलेले योगदान हे अभिमानास्पद आहे आज कचरामुक्त विटा शहरात तृतीय क्रमांकाचे मानांकन मिळाले यानिमित्ताने यासाठी कष्ट घेतलेल्या सर्वांचं विशेषतः  नगरपरिषद सर्व पदाधिकारी कर्मचारी आणि संपूर्ण विटा शहर अभिनंदन करुन या पुढे सातत्याने आपण स्वच्छते मध्ये विटा शहराला अग्रेसर ठेवू या संकल्पासह हार्दिक शुभेच्छा."कचरामुक्त विटा" शहरासाठी सर्वांचे योगदान अतुलनीय : नगराध्यक्षा सौ. प्रतिभा वैभव पाटील
विटा नगरपालिका बरोबर विटा शहरातील सर्व नागरिक असोसिएशन संस्था शाळा-कॉलेज मंडळी महिला या सर्वांनी एकत्र येऊन संपूर्ण विटा शहराला स्वच्छते मध्ये अव्वल स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न केले जी एफ सी स्टार रेटिंग मध्ये विटा शहराला 3 स्टार नामांकन मिळाले यासाठी  सर्व विटेकर यांचे  कष्ट उल्लेखनीय आहे.
हे यश प्राप्त करताना विटा नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी, पदाधिकारी, विटा शहरातील सर्व स्वयंसेवी संस्था, मंडळे, सर्व पत्रकार बंधु, महिला बचत गट, महिला मंडळ, विटा शहरातील सर्व असोसिएशन आणि सर्व विटेकर नागरिक तसेच पूरशासनाशी निगडीत असलेले सर्व अधिकारी, सफाई कर्मचारी, घनकचरा व्यवस्थापन, नाले सफाई, पाणी पुरवठा यंत्रणा, अग्नीशामक दल आदी सर्वांनी अतोनात कष्ट घेऊन विटा शहराला 3 स्टार  नामांकन मिळण्यासाठी विशेष योगदान दिले. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माजी आमदार ॲड. सदाशिवभाऊ पाटील, विटा शहराचे स्वच्छतेचे ब्रँड ॲम्बेसिडर माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव पाटील, विटा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, उपनगराध्यक्ष अजित गायकवाड, मुख्याधिकारी अतुल पाटील, आरोग्य सभापती फिरोज तांबोळी, यांच्यासह सर्व आजी-माजी विषय समिती सभापती व सन्माननीय नगरसेवक नगरसेविका इत्यादींनी शहरासाठी अनमोल योगदान दिले आहे.
No comments:

Post a Comment

Advertise