आटपाडी शहरातील दुकाने आजपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सुरु : सरपंच सौ. वृषाली पाटील : कंटेनमेंट झोन सोडून सकाळी ९ ते ५ यावेळेत दुकाने सुरु राहणार - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, May 22, 2020

आटपाडी शहरातील दुकाने आजपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सुरु : सरपंच सौ. वृषाली पाटील : कंटेनमेंट झोन सोडून सकाळी ९ ते ५ यावेळेत दुकाने सुरु राहणारआटपाडी शहरातील दुकाने आजपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सुरु : सरपंच सौ. वृषाली पाटील : कंटेनमेंट झोन सोडून सकाळी ९ ते ५ यावेळेत दुकाने सुरु राहणार    
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/धिरज प्रक्षाळे :  जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी आज आटपाडी ला भेट देत कोरोना बाबत आढावा बैठक घेतली. यात आटपाडी तालुक्यातील वाढलेल्या कोरोना रुग्णांचा आढावा घेण्यात आला. आरोग्य विभागाला नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सूचना करण्यात आला. यावेळी शहरातील दुकाने चालू करण्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आल्यावर सोशल डिस्टन्सिंग पाळत कंटेनमेंट झोन सोडून सकाळी ९ चे ५ या वेळेत दुकाने चालू ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या असल्याचे सरपंच सौ. वृषाली पाटील यांनी सागितले. त्यामुळे आज दिनांक २२ पासून दुकाने स्रूर होण्याची शक्यता आहे. 

आटपाडी शहरामध्ये एक ही कोरोना बाधित रुग्ण नसताना शहरातील सर्व दुकाने ही सलगपणे बंद ठेवण्यात आली होती. परंतु सध्या तालुक्यात  ७ कोरोनाग्रस्त सापडल्याने दुकाने सुरु करायची म्हणजे नेमके उलटी परिस्थिती असून यामुळे कोरोना या संसर्गजन्य विषाणूचा धोका वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे येथून पुढे जर संसर्ग वाढला तर त्यास जबाबदार कोण असे नागरीकामधून बोलले जावू लागले आहे. 

No comments:

Post a Comment

Advertise