Type Here to Get Search Results !

वलवण येथे गॅस वाहून नेणाऱ्या टँकरचा अपघात ; पोलीस व एचपी कंपनीचे अधिकारी घटनास्थळी दाखल ; कोणतीही जीवीतहानी नाही


वलवण येथे गॅस वाहून नेणाऱ्या टँकरचा अपघात ; पोलीस व एचपी कंपनीचे अधिकारी घटनास्थळी दाखल ; कोणतीही जीवीतहानी नाही 
माणदेश एक्सप्रेस न्युज
खरसुंडी/मनोज कांबळे : वलवण (ता.आटपाडी) येथे आज  गॅस वाहून नेणारा टँकर पलटी झाला. घटनास्थळी पोलीस व एचपी कंपनीचे अधिकारी दाखल झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, भिलवडी ते सोलापूर असा एचपी कंपनीचा ३५ टन गॅस घेऊन जाणाऱ्या एम.एच.-४८-ए-वाय-४७१०  टँकरचा मागील चाकाजवळ असलेला बॅलन्स रोड तुटून सकाळी ६.३० च्या दरम्यान वलवण येथे पलटी झाला. यामध्ये वाहनचालक अक्षय व्यंकटराव ढेले (अहमदपूर जि. लातूर) हा किरकोळ जखमी झाला आहे. सदर माहिती मिळताच सरपंच दगडू गेजगे यांनी तात्काळ घटनास्थळी जावून आटपाडी  पोलिसांना घटनेची माहिती दिली.  सदरच्या टँकरमधून गळती होत आहे का याची तपासणी करण्यासाठी तात्काळ हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे अधिकारी व खरसुंडी पोलीस दूरक्षेत्राचे अंमलदार संजय पळशकर घटनास्थळी दाखल झाले. टँकरमधून कोणतीही गॅस गळती होत नाही असे दिसून आढळून आले.  मात्र लोकवस्तीत झालेल्या अपघातामुळे होणारी मोठी दुर्घटना टळली. सदर टॅंकरमधील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये भरण्यासाठी पुणे येथून मशनरी व मोकळा टँकर येत असल्याची माहिती हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. अपघाताच्या ठिकाणी सुरक्षितता ठेवली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies