Type Here to Get Search Results !

आटपाडी बस स्थानकावरून आटपाडी-सांगली बस धावली ; कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे बससेवेला अत्यल्प प्रतिसाद


आटपाडी बस स्थानकावरून आटपाडी-सांगली बस धावली ; कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे बससेवेला अत्यल्प प्रतिसाद 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/बिपीन देशपांडे : गेल्या दोन महिन्याच्या अथक विश्रांतीनंतर आज सकाळी नऊच्या सुमारास आटपाडी-सांगली या बसमधून अवघे दोन प्रवासी घेऊन बस धावली. आटपाडी शहरासह बाजूस असलेल्या वाड्या-वस्त्यांवर कोरोना बाधितांची अचानक वाढलेली संख्या, त्यामुळे नागरीकांनी घेतलेला धसका, रखरखते ऊन यामुळे बस सेवेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला.
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद आहे. कोरोना चा धोका गर्दित अधिक असल्याने त्याचा पहिला फटका एसटीला बसला. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी जरी आदेश दिला असला तरी शाळा, महाविद्यालय, आठवडी बाजार बंद असल्याने प्रवासी संख्या कमी राहणार आहे. गेल्या पंधरा दिवसात एसटीने परप्रांतीय युवकांना त्यांच्या मूळ गावी पोहच केले. आटपाडी बस स्थानकातून दिवसभरात तीनच फेऱ्या होणार असून सकाळी नऊ  व साडे अकरा वाजता आटपाडी सांगली बस धावेल. दुपारी एक वाजता आटपाडी विटा सुटणार आहे. एका बस मधून एकूण बावीस प्रवाशांना परवानगी देण्यात आली असून एका सीटवर एक प्रवासी बसेल. सर्व प्रवाशांना मास्क वापरणे बंधनकारक असणार आहे. सुरक्षितेच्या दृष्टीने चालक-वाहकांना सॅनिटायझर दिले आहे अशी माहिती वाहतूक नियंत्रक संजय साळुंखे यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies