आमदार गोपीचंद पडळकर यांचे महाविकास आघाडीच्या विरोधात महाराष्ट्र बचाव आंदोलन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, May 22, 2020

आमदार गोपीचंद पडळकर यांचे महाविकास आघाडीच्या विरोधात महाराष्ट्र बचाव आंदोलन


आमदार गोपीचंद पडळकर यांचे महाविकास आघाडीच्या विरोधात 'महाराष्ट्र बचाव आंदोलन' 
माणदेश एक्सप्रेस ऑनलाईन न्यूज
आटपाडी :  कोरोनाविरुद्धच्या लढ्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याने या सरकारला जागे करून प्रभावी काम करण्यास भाग पाडण्यासाठी महाराष्ट्र बचाव आंदोलन असल्याचे प्रतिपादन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले. 

भारतीय जनता पक्षातर्फे मेरा आंगण... मेरा रणांगण... "महाराष्ट्र बचाव आंदोलन"  आज दि.२२ रोजी झरे ता. आटपाडी, जि. सांगली येथे त्यांच्या उपस्थित फलकबाजी धरून करण्यात आले. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असताना या आपत्ती विरोधात लढण्यासाठी कोणतीही प्रभावी उपाययोजना करू न शकणाऱ्या राज्यशासनाचा जाहीर निषेधाचे फलक यावेळी झळकविण्यात आले.
यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, सांगली जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती व विद्यमान जि.प. सदस्य ब्रम्हानंद पडळकर, विभूतवाडीचे सरपंच चंद्रकांत पावणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दिलीप खिलारी आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise