पंढरपूर तालुक्यात कोरोनाची लागण ; या गावातील तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, May 22, 2020

पंढरपूर तालुक्यात कोरोनाची लागण ; या गावातील तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह


पंढरपूर तालुक्यात कोरोनाची लागण ; या गावातील तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह 
माणदेश एक्सप्रेस न्युज
पंढरपूर :  पंढरपूर तालुक्यातील उपरी गावात मुंबई हून आलेल्या एका तरूणाला कोरोनाची लागण झालाय्ने पंढरपूर तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. 
दोन महिन्यापासून कडेकोट बंदोबस्त असल्यामुळे पंढरपूर तालुका कोरोना मुक्त ठेवण्यात प्रशासनाला यश मिळाले होते. दरम्यान मागील तीन चार दिवसांपूर्वी एक तरूण मुंबई हून उपरी गावात आला होता. दोन दिवसापूर्वी त्याला कोरोनाची लक्षणे दिसू लागल्या नंतर सोलापूर येथे उपचारासाठी पाठवण्यात आले होते. तपासणीमध्ये त्याचा कोरोनाची लागण झाली असल्याचे आज निष्पन्न झाले आहे. तालुक्यात कोरोनाची लागण झाल्याने प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी उपरी परिसर व बाजूचा तीन किलो मीटर परिसर सील केल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Advertise