Type Here to Get Search Results !

भाजपला सत्तेशिवाय काहीच दिसत नाही म्हणून राजकारण केले जातंय : जयंत पाटील


भाजपला सत्तेशिवाय काहीच दिसत नाही म्हणून राजकारण केले जातंय : जयंत पाटील
माणदेश एक्सप्रेस ऑनलाईन टीम 
आटपाडी : भाजपला सत्तेशिवाय काहीच दिसत नाही म्हणून राजकारण केले जातंय असे ट्वीट करीत जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.
कोरोनाने संपूर्ण जगच हतलब असताना भाजपचे कार्यकर्ते मात्र राज्य सरकारला प्रश्न विचारत आहेत. देशामध्ये कोरोना आला तेंव्हा पंतप्रधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतामध्ये व्यस्त होते. असे आम्ही म्हंटले नाही, प्रश्न केला नाही. मात्र भाजपला सत्तेशिवाय काहीच दिसत नाही म्हणून राजकारण केले जातय.
भाजपचे लॉक रोज येवून सांगतात कि आम्ही ऐवढी मदत केली. हा प्रसंग जाहिरात करण्याचा आहे का? मदत केली तर त्याची जाहिरात कशाला हवी? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीही मदतीचे आकडे देऊ शकते मात्र अशा संकटकाळी आम्हाला कोणताही बडेजाव करण्यात रस नाही असे सांगत भाजपला त्यांनी फटकारले आहे.
राज्यातून बाहेर गेलेल्या मजुरांची परीस्थित अत्यंत वाईट आहे. राज्य सरकारने त्यांना सर्व व्यवस्था करून पाठविले त्याबद्दल ते महाराष्ट्र सरकारचे आभार मानत आहेत. मात्र त्या राज्यातील सरकार मजुरांना राज्यात घेण्यास राजी नाही. यातील बहुतांश राज्ये भाजपशाशित आहेत. राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणतात, आम्हांला विचारले जात नाही म्हणून आम्ही राज्यपालांना भेटलो. मग इतकी वर्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत काम केले असेल तर त्यांचा नंबर कसे काय विसरला? तुमच्या सूचना असतील तर मोन मोते करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर या व व्यक्त व्हा. असा सल्ला देखील त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies