दो गज की दूरी, सत्ता की लालच बुरी : जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भाजपवर टीका - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, May 21, 2020

दो गज की दूरी, सत्ता की लालच बुरी : जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भाजपवर टीका


दो गज की दूरी, सत्ता की लालच बुरी : जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भाजपवर टीका 
माणदेश एक्सप्रेस ऑनलाईन टीम 
आटपाडी : ‘मेरा अंगण मेरा 'रणांगण' या भाजपने पुकारलेल्या आंदोलनावर राज्याचे जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार टीका करत भाजप ला महाराष्ट्र धर्म पाळण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
चंद्रकांतदादा पाटील ‘मेरा अंगण मेरा 'रणांगण' या पुकारलेल्या आंदोलनावेळी भाजप कार्यकत्यांनी कोणे कपडे घालावेत, कोणत्या घोषणा द्यावात, बातम्या कशा पाठवावयात याचे आदेश देणारे २ पाणी पत्रच तयार केले आहे. 

चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या पत्रात आंदोलनादरम्यान कोणत्या घोषणा द्यायच्या याबाबत सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे या घोषणा आणि आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्यात आले आहे. खास करुन 'उद्धवा अजब तुझे निष्फळ सरकार' ही घोषणा मुख्यत्वे द्या, असे आदेश चंद्रकात दादा पाटील यांनी दिले आहेत. या प्रमुख घोषणेसोबतच 'महाराष्ट्राची जनता मरणाच्या दारात, उद्धव सरकार मात्र आपल्या घरात', ठाकरे सरकार हाय हाय', 'उद्धव मात्र भाषण ठोकतो डरोना डरोना पण रोखता येईना तुला करोना करोना', 'हातात वाडगे-केंद्राकडे बोट, निर्णयात मात्र तुझ्याच खोट' अशा प्रकारच्या घोषणांची एक जंत्रीच चंद्रकात दादा पाटील यांनी आपल्या आदेशात दिली आहे. 
त्यामुळे जयंत पाटील यांनी ट्वीट करत चंद्रकांतदादा पाटील व भाजप ला 'महाराष्ट्रधर्म' पाळण्याचे आवाहन करीत  दो गज की दूरी, सत्ता की लालच बुरी असे म्हणत जोरदार टीका केली आहे.

No comments:

Post a Comment

Advertise