उदनवाडीत संचारबंदी असताना बैलगाडी व घोडागाडी शर्यतीचा सराव : ६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल ; ४ अटकेत तर २ फरार - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, May 21, 2020

उदनवाडीत संचारबंदी असताना बैलगाडी व घोडागाडी शर्यतीचा सराव : ६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल ; ४ अटकेत तर २ फरार


उदनवाडीत संचारबंदी असताना बैलगाडी व घोडागाडी शर्यतीचा सराव : ६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल ; ४ अटकेत तर २ फरार 
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगोला/प्रतिनिधी : संपूर्ण देशामध्ये व राज्यात कोरोना या संसर्गजन्य विषाणूमुळे लॉकडाऊन व संचारबंदी असताना उदनवाडी ता. सांगोला, जि. सोलापूर येथे संचारबंदीचे उल्लंघन झाले असून संचारबंदीच्या काळात बैलगाडी व घोडागाडी शर्यतीचा सराव केल्याने ६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ४ जणांना अटक करण्यात आली आहे तर २ जण फरार आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोरोना कोव्हीड-१९ ची साथ सर्वत्र चालु असताना मौजे उदनवाडी ता. सांगोला गावच्या हददीत दि. १९/०८/२०२० रोजी सकाळी ०८:00 ते ०९:00 या वेळात स्थानीक लोकानी बैल व घोडा गाडी शर्यतीचा सराव घेतल्याबाबत गोपनीय माहिती सांगोला पोलिसांना प्राप्त झाल्याने पोलसांनी १) विजय सोपान आलदर रा. झापाची वाडी ता. सांगोला, २) धनाजी तातोबा सरगर रा. काळामळा उदनवाडी, ३) नवनाथ ऋषीश्वर वलेकर, ४) साईनाथ बापु सरगर ५) बापुराव चंद्रकांत सरगर, सर्व रा. उदनवाडी ता. सांगोला तसेच ६. भिमराव देवीदास लवटे रा. बुध्देहाळ ता. सांगोला यानी या सरावामध्ये सहभाग घेतल्याची माहिती मिळाल्याने त्यांना  ताब्यात घेवुन त्यांच्याकडे विचारपुस केली असता त्यानी दि. १९/०५/२०२० रोजी सकाळी ०८:00 ते ०९:०० या वेळात उदनवाडी गावचे हद्दीत कॅनालच्या शेजारी मोकळया शेतात ०५ बैल व घोडा जोडीच्या शर्यत लावण्याच्या उद्देशाने बैल व घोडा गाडी शर्यतीचा सराव केला असल्याची माहिती मिळाली. सदरवेळी बैल व घोडा या पाळीव प्राण्याला त्रास होईल याची माहिती तसेच कोरोना कोव्हीड-१९ च्या अनुषंगाने संचारबंदी, लॉकडाउन, ५ पेक्षा जादा इसमांनी एकत्र न येणे, कोरोनाचा प्रसार होवु नये म्हणुन योग्य ती दक्षता घेणे याबाबतचे आदेश जारी केलेची माहिती असताना त्यानी सदरचे कृत्य केल्याची खात्री झाली. त्यामुळे घडल्या प्रकाराबाबत अधिक माहिती संकलीत करुन नमुद इसमांच्या विरुध्द दि. १९/०५/२०२० रोजीच पोना. हजरत मनसुब पठाण बनं. १७४४ नेम. सांगोला पोलीस ठाणे यांनी तक्रार दिलेली असुन आरोपींच्याविरुध्द भादविक.१४३,१८८,२६९,२७० तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११(१)(अ), राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा सन २००५ चे कलम ५१ (ब), महाराष्ट्र पोलीस कायदा सन १९५१ चे कलम ३७(३)/१३५, साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम सन १८९७ चे कलम २, ३ व ४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हयाचा तपास पोना. निंबाळकर हे करीत आहेत. गुन्हयातील ६ पैकी ४ आरोपीना अटक केली असुन उर्वरीत दोन आरोपींचा शोध चालु आहे. 
आरोपीनी गुन्हयात शर्यत सरावाकरीता वापरलेल्या ५ गाडया जप्त केलेल्या आहेत. या शर्यत सरावासंबंधाने साक्षीदारांकडे चौकशी करण्यात आलेली आहे. सदर प्रकरणी पोलीस प्रशासनाकडुन वेळीच सखोल माहिती प्राप्त करुन कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. लॉकडाउन व संचारबंदीच्या काळात अशा प्रकारचे गुन्हे करणारे व्यक्तींविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मोहिम अधिक तीव्र करणार असल्याचे तसेच सध्या संपुर्ण जगावर आलेल्या संकटास तोंड देण्याकरीता सर्व नागरिकांनी शासनाकडुन देण्यात येणारे सर्व सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी केले आहे.

No comments:

Post a Comment

Advertise