बोलोरो पिक अप वाहन पोलिसाचे अंगावर घातल्याने पोलीस रामेश्वर परचंडे यांचा मृत्यू - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, May 23, 2020

बोलोरो पिक अप वाहन पोलिसाचे अंगावर घातल्याने पोलीस रामेश्वर परचंडे यांचा मृत्यू


बोलोरो पिक अप वाहन पोलिसाचे अंगावर घातल्याने पोलीस रामेश्वर परचंडे यांचा मृत्यू 
माणदेश एक्सप्रेस न्युज
सोलापूर : सोलापूर ग्रामीण येथील श्वान पथकास नेमणुकीस असलेले पोकॉ/२०१२ रामेश्वर गंगाधर परचंडे हे सध्या कोवीड १९ अनुषंगाने कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंद्रुप पोलीस ठाणेस दिनांक २१/०५/२०२० रोजीचे सायंकाळी २०:०० वा ते २२/०५/२०२० रोजीचे ०८:०० पर्यंत मौजे वडकबाळ येथील नाकाबंदी पॉईटवर कर्तव्य बजावत असतान, सदर ठिकाणी एक बोलोरो पिक अप वाहन अति वेगाने येताना दिसले. सदर वाहनास थांबविण्याचा इशारा केला असता, सदरचे वाहन हे न थांबता पोकॉ/२०१२ रामेश्वर गंगाधर परचंडे यांन गंभीर जखमी करून निघुन गेले. सहकाऱ्याने  पोकॉ/रामेश्वर परचंडे यांना उपचारास्तव अश्विनी हॉस्पीटल येथे दाखल केले. सदर उपचारा दरम्यान आज दिनांक २३/०५/२०२० रोजी पोकॉ/२०१२ रामेश्वर गंगाधर परचंडे हे शहीद झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व १ मुलगा आहे. शहीद पोकॉ/२०१२ रामेश्वर गंगाधर परचंडे यांचेवर रुपाभवानी मंदिर जवळील तुळजापूर रोड, सोलापूर येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येवुन, त्यांना सोलापूर ग्रामीण पोलीस दलाकडुन मानवंदना देण्यात आली आहे. 

याघटने संदर्भात अनिल देशमुख, गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य, दत्ता भरणे, पालकमंत्री, सोलापूर, शंभुराजे देसाई, गृह राज्यमंत्री ग्रामीण, सतेज पाटील, गृह राज्यमंत्री शहर, यांनी व पोलीस महासंचालक, म.राज्य मुंबई, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांनी दुःख व्यक्त करून आदरांजली वाहिली आहे. या अनुषंगाने मंद्रुप पोलीस ठाणे येथे १४५/२०२० प्रमाणे गुन्हा दाखल असुन, सदर गुन्हयाचा तपास श्री. प्रभाकर शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी, सोलापूर ग्रामीण विभाग हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise