Type Here to Get Search Results !

आटपाडी शहरातील पतसंस्था कामकाज बंद राहणार


आटपाडी शहरातील पतसंस्था कामकाज बंद राहणार 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरामध्ये एकजण कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने आटपाडी तालुक्यामध्ये खबरदारीचा उपाय म्हणून पुढील आदेश येईपर्यंत शहरातील सर्व पतसंस्था कामकाज बंद राहणार असल्याचे आटपाडी तालुका सचिव संघटनेचे दत्तात्रय स्वामी यांनी सांगितले.
आटपाडी शहरातील ज्या परिसरामध्ये हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला आहे तेथील असणारा परिसर कंटेनमेंट झोन मध्ये येतो. सदरचा परिसर कंटेनमेंट झोन परिसर हा आटपाडी शहराच्या मुख्य भागामध्ये येतो व शहरातील बँका व पतसंस्था ह्या याच परिसरातील असल्यामुळे कोरोना धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील सर्व पतसंस्थेचे व्यवहार बंद राहणार असल्याची नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन दत्तात्रय स्वामी यांनी केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies