आटपाडी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस सुरवात - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, May 29, 2020

आटपाडी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस सुरवात


आटपाडी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस सुरवात
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एकुण १८९ शाळांमध्ये सन २०२०-२१ सालातील इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या वर्गात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे. यंदाच्या वर्षी कोरोना महामारीच्या परिस्थितीमुळे शाळा कधी उघडतील हे सांगता येत नसले तरी शाळांनी १५ जूनपासून ऑनलाईन अध्यापन सुरु करण्याच्या दृष्टीने यावर्षी विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत ऑनलाईन प्रवेश देण्यासाठी गुगल फॉर्मची निर्मिती केली आहे.
तालुक्यातील कोणत्याही जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घ्यावयाचा असल्यास सदरचा ऑनलाईन फॉर्म भरुन प्रवेश घेता येणार आहे. https://bit.ly/2XcENb9 या लिंकवर शाळा निवडुन विद्यार्थ्यांची माहिती भरुन प्रवेश निश्चित करता येईल. त्याच बरोबर शाळा सुरु झाल्यानंतरही शाळेत जाऊन प्रवेश घेता येईल. आटपाडी तालुक्यातील जास्तीत जास्त पालकांनी ऑनलाईन फॉर्म भरुन आजच आपल्या पाल्याचा प्रवेश जिल्हा परिषदेच्या शाळेत करावे असे आवाहन शिक्षण विभाग, पंचायत समिती आटपाडीच्या वतीने करण्यात आले आहे. 

No comments:

Post a Comment

Advertise