Type Here to Get Search Results !

नेर्ली तील ५७ वर्षीय व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह


नेर्ली तील ५७ वर्षीय व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह 
माणदेश एक्सप्रेस न्युज
कडेगाव/प्रतिनिधी : नेर्ली ता. कडेगाव येथील मुंबईहून आलेल्या ५७  वर्षीय पुरुषाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अशी माहिती कडेगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ.माधव ठाकूर यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, नेर्ली येथील पती,पत्नी व मुलगा व मुलगी असे चौघेजण मुंबई येथून आले होते. त्यांना त्यांच्या घरी होम क्वारंटाईन करण्यात आले होते. दरम्यान यापैकी ५७ वर्षीय पुरुषास गुरुवारी कोरोनाची लक्षणे आढळल्याने मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांचा स्वाब घेतला असता अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबतची माहिती कडेगाव तालुका आरोग्य विभागाला मिळताच त्यांच्या ५१  वर्षीय पत्नीस व २५ वर्षीय मुलगीला कडेगाव येथे संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले आहे. दरम्यान कोरिना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या  २७ वर्षीय मुलासही मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. त्याचीही कोरोना चाचणी घेण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies