निंबवडे येथे कृषीविषयक कार्यक्रम संपन्न - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, May 29, 2020

निंबवडे येथे कृषीविषयक कार्यक्रम संपन्न


निंबवडे येथे कृषीविषयक कार्यक्रम संपन्न 
माणदेश एक्सप्रेस न्युज
निंबवडे/वार्ताहर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडून सोशल डिस्टस्निंग पाळत निंबवडे येथे शेतकरी शेतीशाळा आयोजित करण्यात आली. यावेळी टोळधाड नुकसान व त्याचे नियंत्रण, मका लागवड, नवीन वाण, मकेवरील किडी याविषयीची माहिती मोंसेंटो कंपनीचे के.डी. होले यांनी दिली. 
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत कृषी विभागाच्या योजना माहिती फळबाग लागवड योजना डाळिंब, आंबा, पेरू, चिंच, चिकू लागवड अंतर व अनुदान नाडेप टाकी फायदे अनुदान, 10 हजार, गांडूळ खत प्रकल्प फायदे, अनुदान 10 हजार याविषयी माहिती कृषी सहायक तुकाराम माने यांनी दिली.
यावेळी निंबवडेचे कृषी सहायक शिवाजी सूर्यवंशी यांनी खरीप हंगाम पूर्वनियोजन विषयी मार्गदर्शन केले व हुमणी अळीचा जीवनक्रम, नुकसान, नुकसानीची अवस्था, अळी चे नियंत्रण, प्रकाश सापळ्यांचा वापर, एरंडी आंबावन सापळा या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी गावातील शेतकरी डॉ. बी.टी. पिंजारी, विजय मोटे, कृषिमित्र किरण पाटील, दामोदर मुढे, अतिश कोळेकर, मारुती देवडकर, प्रतापसिंह मोटे, पत्रकार राघव मेटकरी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise