आटपाडी सोनारसिद्ध येथील एकाचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह ; तालुक्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ८ - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, May 23, 2020

आटपाडी सोनारसिद्ध येथील एकाचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह ; तालुक्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ८


आटपाडी सोनारसिद्ध येथील एकाचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह ; तालुक्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ८ 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : सोनारसिद्ध ता. आटपाडी, जि. सांगली येथील आणखी एकजणाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला असून सोनारसिद्ध मध्ये आता ३ व्यक्ती कोरोनाग्रस्त असून आटपाडी तालुक्यात एकूण ८ जण कोरोना बाधित झाले आहेत.
सोनारसिद्ध येथील दोन बहिणींचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला होता. तर आज आणखी एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने एकट्या सोनारसिद्ध मध्ये तीन जण कोरोनाग्रस्त आहेत. तर तालुक्यामध्ये आटपाडी ३ , पिंपरी खुर्द व पिंपरी बुद्रुक १ व सोनारसिद्ध ३ असे आठ कोरोना ग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त रुग्ण आटपाडी तालुक्यातच आढळून आले आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise