Type Here to Get Search Results !

“या” पालिकेने थकित घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याची होत आहे मागणी


“या” पालिकेने थकित घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याची होत आहे मागणी
माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड/अहमद मुल्ला : सध्या संपूर्ण जगभरात कोरोना चे थैमान चालू आहे त्यासाठी सलग चार लॉकडॉऊन केल्याने दुष्काळी भागातील म्हसवडकर जनता आर्थिक दृष्ट्या त्रासली आहे. नोकरदार, छोटे दुकानदार, मजूर, चाकर, उद्योगधंदे वाले, हातावर पोट असणारे कामगार या सर्वांचे खूप आर्थिक नुकसान झाले आहे. सुमारे दोन महिन्याच्या लॉकडाऊनमुळे जवळचे पैसे संपले आहे. इथून पुढे जगावे कसे असा प्रश्न उभा आहे? त्यातच आता नगरपालिकेची वार्षिक घरपट्टी व पाणीपट्टी यांच्या थकीत बाकीसह २५ ते २७ टक्के असा दंड व सन २०१९-२०२० ची घरपट्टी व पाणीपट्टी तसेच नगरपालिका हद्दीतील 1000 चौ. फूटाच्या आतील मिळकती धारकांचे चालू वर्षाची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करुन करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी नागरिकांनामधुन होत आहे.
म्हसवड पालिकेचा पाणी पुरवठाही मनमानी पध्दतीने सुरु आहे. सहा ते दहा दिवसाआड गेली दोन महिने पाणीपुरवठा सुरु आहे. सातारा सारख्या शहरी भागातील पालिकेने एक दिवस जरी पाणी पुरवठा केला नाही तर नागरिक रस्त्यावर उतरुन आंदोलने करतात. हंडा, मोर्चे काढून रस्ते अडवतात व पालिकेचे लक्ष वेधत असतात. परंतु म्हसवड पालिका मात्र सहा ते दहा दिवसांना पाणी पुरवठा करीत आहे. तोही पुरेसा नसतो. लॉकडाऊन कालावधीत कुटुंबातील सर्व माणसे घरात डांबून आहेत. त्यामुळे नियमित पेक्षा पाणी अधिक लागत असल्याची जाणीव पालिकेसही आहे  व पालिकाही वस्तुस्थिती नाकारू शकतच नाही. जे म्हसवड नगरीतील पदाधिकारी, मोठे नेते, कार्यकर्ते आहेत. त्यांना मात्र पाणी टंचाईची झळ पोहचत नाही कारण त्यांची नळ कनेक्शन सुपर पाईपलाईनवर आहेत. त्यामुळे त्यांना एक ते दोन दिवसाआड नळास पाणी उपलब्ध होत आहेत.याउलट सामान्य नागरिकांचे पाणी टंचाईने हाल होत आहेत. त्यामुळे म्हसवड पालिकेने घरपट्टी व नळपाणीपट्टी माफ करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies