Type Here to Get Search Results !

आटपाडी बाजारपेठेतील दुकाने सुरु ; सोशल डिस्टन्सिंगचे पालन गरजेचे : व्यापारी वर्गात आनंद


आटपाडी बाजारपेठेतील दुकाने सुरु 
सोशल डिस्टन्सिंगचे पालन गरजेचे : व्यापारी वर्गात आनंद 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/बिपीन देशपांडे : कोरोना शी लढा देत जवळपास दोन महिन्यातून कंटेनमेंट सोडून बंद असलेली बाजारपेठ सुरू करण्यात आली. आटपाडी तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने लोकांनी धास्ती घेतली. व्यापार बंद असल्याने मजूर वर्गाचे हाल होत होते. तर छोटे-मोठे व्यवसाय बंद असल्याने पोटाची भूक स्वस्त काही बसून देत नव्हती. बंद दार उघडून सर्वकाही चालू होते. मात्र कोरोना च्या पार्श्वभूमीवर शहरात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी विविध उपाययोजना आढावा बैठक घेत कंटेनमेंट झोन सोडून सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत सर्व दुकाने खुली करण्याचे आदेश दिल्याने दुकानदार, व्यापाऱ्यांनी आदल्या दिवशी झाडलोट स्वच्छता करत चक्रव्यूह भेदत सोशल डिस्टन्सचे पालन करीत दुकाने चालू केली. यावेळी त्यांना चेहऱ्यावरील आनंद लपवता आला नाही.
आज शनिवार आठवडा बाजार असल्याने मुख्य बाजार पेठ व भाजी मंडई गर्दीने फुलली होती. दैनंदिन व्यवहार सुरू होणे गरजेचे असल्याने माणूस उद्योगाला लागल्याचे चित्र होते. उत्पन्नाचे साधन बंद झालेल्यांना रस्त्यावर उतरणे शिवाय पर्याय नव्हता. अशा परिस्थितीत लोकांनी स्वतः सह परिवाराची काळजी घेतली पाहिजे. आटपाडी तालुक्यात अजूनही राज्यातुन परराज्यातून व्यक्ती आपल्या गावी येत आहेत. दैनंदिन व्यवहार सुरू झाले तरी रस्ते व बाजारपेठ फुलले आहेत. बस सेवा सुरू आहे. तालुक्यात कोरोना बाधित संख्या सात असली तरी अजूनही धास्ती आहे. सर्वांनी गांभीर्याने दखल घेणे गरजेचे असून सावधगिरी बाळगली तर ठीक नाहीतर इतके दिवस काटेकोरपणे पाळलेले लॉकडाऊन जरा थोडीशी चूक झाली तर पालथ्या घड्यावर पाणी पडेल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies