आटपाडी शहरात दुसरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला ; सदरचा रुग्ण मुंबईहून आला होता - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, May 20, 2020

आटपाडी शहरात दुसरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला ; सदरचा रुग्ण मुंबईहून आला होता


आटपाडी शहरात दुसरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला ; सदरचा रुग्ण मुंबईहून आला होता 
माणदेश एक्सप्रेस न्यूज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरामध्ये दिल्लीहून आलेला रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला होता. तर त्यांच्या संपर्कातील व्यक्ती निगेटिव्ह आल्याने आटपाडीकरांची धाकधूक कमी झाली होती. परंतु आता मुंबईहून आलेल्या एकाला कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले झाल्याने पुन्हा आटपाडीकरांची धाकधूक वाढली आहे.
सदरची व्यक्ती मुंबईहून आलेली होती. त्या व्यक्तीला संस्था क्वारंनटाइन करण्यासाठी ग्रामपंचायत कडून वारंवार सांगण्यात आले होते. परंतु त्याने टाळाटाळ केल्याने ग्रामपंचायतकडून त्याला नोटिस देण्यात आली होती. नोटीस दिल्यावर तो संस्था क्वारंनटाइन झाला होता. परंतु त्याला कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्याची तपासणी केली असता त्याचा स्वाब पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आटपाडी शहरात आता दुसरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने आटपाडीकरांची धाकधूक वाढली आहे.

No comments:

Post a Comment

Advertise