Type Here to Get Search Results !

बनपुरीच्या कन्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सविता कदम यांनी परप्रांतीय मजुरांना दिला मदतीचा हात


बनपुरीच्या कन्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सविता कदम यांनी परप्रांतीय मजुरांना दिला मदतीचा हात
माणदेश एक्सप्रेस न्यूज
मुंबई : लॉकडाऊनमध्ये परप्रांतीय मजूर तीन दिवसांपासून उपाशी असल्याचे कळताच त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून आरे पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अधिकाऱ्याने माणुसकीचे दर्शन घडवले आहे. कोरोनाच्या महामारीत पोलीस देवदूत बनून लोकांसाठी आपला जीव धोक्यात घालून काम करत असतानाच दुसऱ्या बाजूला ते पदरमोड करून लोकांना मदत करीत असल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. 
गोरेगाव पूर्व आरे कॉलनी येथील गणेशवाडी परिसरात राहणारे काही परप्रांतीय मजूर तीन दिवस उपाशी असल्याची माहिती एका स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यामार्फत आरे पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक व बनपुरीच्या कन्या बनपुरीचे माजी सरपंच भारत वाघमारे यांच्या भाची असणाऱ्या सविता कदम यांना मिळाली होती. पश्चिम बंगाल येथील १६ मजुरांसह एक महिला आणि दोन वर्षांचे बाळदेखील उपासमारीचे चटके सहन करत होते. इमिटेशन ज्वेलरीच्या कारखान्यात काम करणारे हे मजूर लॉकडाऊनमुळे बेरोजगार झाले. हळूहळू जमापुंजी संपल्यानंतर त्यांची उपासमारी सुरू झाली. आरे कॉलनीत अशा प्रकारे मजूर उपाशी असल्याचे समजताच कदम यांनी त्या मजुरांपैकी दोघांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. सहकारी पोलीस अंमलदार मिथुन इंगळे, खामकर, बंडगर यांच्या मदतीने तांदूळ, डाळ, पीठ, तेल, कांद-बटाटे आदी जीवनावश्यक वस्तू या मजुरांना देऊन पुन्हा गरज भासल्यास बिनधास्तपणे संपर्क साधण्यास त्यांनी या मजुरांना सांगितले. 
एकीकडे पोलीस कोरोनाशी युद्ध करीत आहेत, तर दुसरीकडे कोणी उपाशी राहिल्यास त्याला अन्नधान्य वितरण करीत आहेत. कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवलेल्या मानवतेमुळे ते मजूर भारावल्याचे दिसून आले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies