अखिल भारतीय मराठी महासंघच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी अजित (भैय्या) शिंदे - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, May 20, 2020

अखिल भारतीय मराठी महासंघच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी अजित (भैय्या) शिंदे


अखिल भारतीय मराठी महासंघच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी अजित (भैय्या) शिंदे
माणदेश एक्सप्रेस न्यूज
खानापूर/वार्ताहर : पश्चिम बंगाल गलाई बांधव आसोसिएशन पश्चिम बंगालचे अध्यक्ष  अजित (भैय्या) शिंदे यांची अखिल भारतीय मराठी महासंघ या संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास (नाना) शिंदे यांचे जेष्ठ बंन्धू आहेत.
अखिल भारतीय मराठी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अनिलभाऊ पाटील (हातनोली) व राष्ट्रीय महासचिव प्रदिपकाका पाटील, (ढवळेश्वर), राष्ट्रीय कोषाध्यक्ष संदीपभाऊ घोरपडे (ढवळी), संरक्षक राजारामबापू देशमुख,  (औंध) व प्रमुख पदधिकारी सदस्य यांच्या एकमुखी ठरावाव्दारे अजित (भैय्या) शिंदे याची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. 
यावेळी बोलताना अनिलभाऊ पाटील म्हणाले की, अजितभैय्या यांच्यामुळे संघटनेला मोठ्या प्रमाणात बळ मिळाले असून याबळाच्या माध्यमातून आम्ही गलाई बांधवाच्या अडी-अडचणीत मदत करण्यासाठी तत्पर राहून त्या सोडवून सक्षम करणार आहे..
तर निवडीनंतर अजित (भैय्या) म्हणाले, भारत देशात पसरलेल्या  गलाई बांधवाच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी मी चौवीस तास उपलब्ध राहून प्रत्येक गलाई बांधवाला अडचणीच्या वेळी मदतीसाठी सर्वात पुढे असेन, गलाई बांधवाला संघटनेच्या माध्यमातून न्याय   मिळवून देईल व आपण टाकलेला विश्वास सार्थ ठरविन.

No comments:

Post a Comment

Advertise