घराच्या अंगणाला 'रणांगण' बनवणं शहाणपण नाही, ‘काळे झेंडे’ आंदोलन कोरोना योद्धाचा अपमान : अजित पवार - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, May 21, 2020

घराच्या अंगणाला 'रणांगण' बनवणं शहाणपण नाही, ‘काळे झेंडे’ आंदोलन कोरोना योद्धाचा अपमान : अजित पवार


घराच्या अंगणाला 'रणांगण' बनवणं शहाणपण नाही, ‘काळे झेंडे’ आंदोलन कोरोना योद्धाचा अपमान : अजित पवार
माणदेश एक्सप्रेस ऑनलाईन टीम 
आटपाडी : ‘मेरा अंगण मेरा 'रणांगण' या भाजपने पुकारलेल्या आंदोलनावर राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार टीका करत, घराच्या अंगणाला 'रणांगण' बनवणं शहाणपण नाही, ‘काळे झेंडे’ आंदोलन हे कोरोना योद्धाचा अपमान असल्याचे त्यांनी म्हंटल आहे.

महाराष्ट्र राज्य या आव्हानांचा यशस्वी सामना करत असताना भाजपने 'काळे झेंडे' सारखे आंदोलन करुन महाराष्ट्रातील कोरोना योध्दांचा अपमान करू नये. कोरोना विरुद्धच्या लढाईत अडथळे आणू नयेत. भाजपने काळे झेंडे आंदोलन मागे घेऊन कोरोनाविरुद्धच्या लढाईत सहभागी व्हावे, महाराष्ट्र विरुद्धच्या कटाचा भाग बनण्याचं पाप माथी घेऊ नये, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पुकारलेले काळे झेंडे आंदोलन हे अवेळी पुकारलेले, अनाकलनीय आंदोलन आहे. या आंदोलनातून महाराष्ट्राचं आणि भाजपचं काहीही भलं होणार नाही. राज्यातील प्रत्येक जण कोरोनाविरुद्धच्या लढाईत योगदान देत असताना अशा पद्धतीचं 'काळं' आंदोलन करण्याची कल्पना कोणाच्या डोक्यात कशी येऊ शकते, हा राज्याला पडलेला प्रश्न आहे, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
Join Free WhatsApp माणदेश एक्सप्रेस

No comments:

Post a Comment

Advertise