कारंडेवाडी खुनातील आरोपीच्या माण पोलिसांनी १२ तासाच्या आत आवळल्या मुसक्या - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, May 21, 2020

कारंडेवाडी खुनातील आरोपीच्या माण पोलिसांनी १२ तासाच्या आत आवळल्या मुसक्या


कारंडेवाडी खुनातील आरोपीच्या माण पोलिसांनी १२ तासाच्या आत आवळल्या मुसक्या 
माणदेश एक्सप्रेस न्यूज
म्हसवड/प्रतिनिधी : कुकुडवाड (कारंडेवाडी) खुनातील संशयीत आरोपी संदिप उर्फ पप्या यास म्हसवड पोलिसांनी 12 तासाच्या आत शिताफीने अटक केल्याने म्हसवड पालिसांचे माण तालुक्यातून कौतुक होत आहे.
 या बाबतची माहिती अशी  कुकुडवाड ता. माण येथील कारंडेवाडी येथे नंदीवाले समाजाचे एक कुटुंब गत 50 वर्षापासून रहात आहे. हे कुटुंब वडजल, कारंडेवाडी व परिसरात मोलमजुरी करून स्थिर झाले असताना अलिकडच्या काळात तरूण पिढी व्यसनाधिन झाली असून, परवा रात्री नेहमीप्रमाणे चुलता लक्ष्मण आण्णा चव्हाण व पुतण्या संदीप उर्फ पप्या वसंत चव्हाण यांच्यात पाच वाजल्यापासून भांडणाला सुरूवात झाली होती. ही भांडण नेहमीचीच म्हणून कोण लक्ष देत नव्हते. सदर भांडणांचा राग मनात धरून संदिप चव्हाण याने रात्री उशीरा चुलता लक्ष्मण आण्णा चव्हाण हा बाहेर झोपला असल्याचा फायदा घेऊन गळ्यावर दोन्ही बाजूला धारधार हत्याराने वार करून निर्घुन हत्या केल्याने माण तालुक्यात खळबळ उडाली होती.
 ही घटना कुकुडवाड वडजल परिसरात वाऱ्यासारखी पसरली होती. कुकुडवाड पोलिस पाटील सौ. वैशाली उमेश काटकर  यांनी या घटनेची खबर म्हसवड पोलिस ठाण्यात दिल्याने बीट हवालदार अशोक कांबळे,  पोलिस हवलदार नंदकुमार खाडे घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी महामुनी व सपोनि गणेश वाघमोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन फरारी झालेल्या आरोपीच्या शोध घेण्यासाठी पथके तयार करून तपासाची चक्रे फिरवली. संशयित आरोपी हा कुकुडवाड परिसरात छोट्या मोठ्या चोऱ्या करत असत असल्याने निर्ढावलेले होता. चुलत्याचा रात्री खुन करून वडजलच्या डोंगरदर्यात पहाटे थांबून  तो सकाळी 11 वाजता नरवणेच्या दिशेने दहिवडी कडे चालला होता. ही खबर वडजलच्या पोलिस पाटील सौ. मोनाली बनसोडे यांना समजताच त्यांनी तातडीने सपोनि गणेश वाघमोडे यांना आरोपी हा नरवणे गावापासून काळेवाडीच्या दिशेने अंगात रेगारेगाचा निळसर शर्ट जीन्स पॅट, डोक्यावर टाॅवेल गुंडाळलेला पायात चप्पल न घालता लंगडत चालला असल्याचं सांगितलं असता पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी महामुनी यांचे मार्गदर्शनाखाली व सपोनि गणेश वाघमोडे यांनी पीएसआय. अमोल कदम, पोलिस हवलदार नंदकुमार खाडे, नितीन युवराज धुमाळ, अशोक कांबळे, श्रीनिवास सानप, संतोष काळे अभिजीत भादुले, संतोष बागल  यांना सुचना करून तीन पथके नेमून सर्व रस्त्यांवर साध्या वेषात पोलिस उभे केले तर नंदकुमार खाडे  व नितिन धुमाळ यांचे पथक नरवणे काळेवाडी गोंदवले गावांचा परिसरात शोध घेत होते. आरोपी हा दहिवडी येथील फलटण चौकांत सायंकाळी 7 च्या सुमारास फलटण मार्गे जेजुरीला जाण्यासाठी निघाला असताना  त्याच्या काॅलरला हात घालताच हिसका देऊन पळाला मात्र पोलिसांनी  पाठलाग करून पकडला व म्हसवड पोलिस ठाण्यात गजाआड केल्याने हा गुन्ह्यातील आरोपीस 12 तासाच्या आत पकडल्याने म्हसवड पोलिसांचे माण तालुक्यात कौतक होत आहे. दरम्यान संशयित आरोपी संदिप उर्फ पप्या वसंत चव्हाण यास कोर्टात हजर केले असता, पाच दिवसाची पोलिस कस्टडी देण्यात आली आहे.


No comments:

Post a Comment

Advertise