सांगली जिल्ह्यात 26 रूग्ण कोरोनामुक्त ; विजयनगर येथील रूग्णाच्या कुटूंबातील सर्वांचे अहवाल निगेटीव्ह ; इस्लामपूर येथील कोरोना बाधीत कुटूंबाशी संबंधित महिलेचा दुसरा अहवाल निगेटीव्ह ; जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, April 20, 2020

सांगली जिल्ह्यात 26 रूग्ण कोरोनामुक्त ; विजयनगर येथील रूग्णाच्या कुटूंबातील सर्वांचे अहवाल निगेटीव्ह ; इस्लामपूर येथील कोरोना बाधीत कुटूंबाशी संबंधित महिलेचा दुसरा अहवाल निगेटीव्ह ; जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरीसांगली जिल्ह्यात 26 रूग्ण कोरोनामुक्त ; विजयनगर येथील रूग्णाच्या कुटूंबातील सर्वांचे अहवाल निगेटीव्ह ; इस्लामपूर येथील कोरोना बाधीत कुटूंबाशी संबंधित महिलेचा दुसरा अहवाल निगेटीव्ह ;  जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : विजयनगर, सांगली येथील कोरोना बाधीत झालेल्या व काल मृत्यू पावलेल्या रूग्णाशी संबंधित एकूण 16 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. यामध्ये  सदर रूग्णाच्या कुटुंबातील 5 व्यक्ती होत्या. यापैकी आई, वडील, भाऊ व पत्नी यांचे अहवाल सकाळीच प्राप्त झाले होते व ते निगेटीव्ह होते. रूग्णाच्या मुलाचा अहवाल सायंकाळी प्राप्त झाला असून तो ही निगेटीव्ह आला आहे. सदर व्यक्तीशी संबंधित संपर्क बाधित अन्य 11 जण इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनमध्ये होते त्यांचेही अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाले असून ते ही निगेटीव्ह आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. तर इस्लामपूर येथील कोरोना बाधीत कुटुंबाशी संबंधित महिला मिरज येथील आयसोलेशन कक्षात उपचार घेत होती. सदर महिलेचा दुसरा अहवालही निगेटीव्ह आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरानाची लागण झालेल्या 27 रूग्णांपैकी 26 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. 

No comments:

Post a Comment

Advertise