वाढदिवसाचा खर्च टाळून प्रशासकीय यंत्रनेला सॅनिटायझर आणि मास्क वाटप - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, April 20, 2020

वाढदिवसाचा खर्च टाळून प्रशासकीय यंत्रनेला सॅनिटायझर आणि मास्क वाटप


वाढदिवसाचा खर्च टाळून प्रशासकीय यंत्रनेला सॅनिटायझर आणि मास्क वाटप
माणदेश एक्सप्रेस न्युज
निंबवडे/राघव मेटकरी : निंबवडे ता. आटपाडी, जि. सांगली येथील समाधान पिंजारी यांनी आपला स्वतःचा वाढदिवस कोरोना च्या पार्श्वभूमीवर साजरा न करता त्या ऐवजी त्या खर्चातून गावामध्ये कोरोनाचा विरुद्ध लढा देत असलेल्या  टीमला सॅनिटायझर आणि मास्क वाटप करण्याचा कौतुकास्पद उपक्रम राबविला. गावात सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील याच्या हस्ते गावातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन आणि पोलिस मित्र या सर्व यंत्रणेला हे वाटप करण्यात आले. या उपक्रमाबद्दल सरपंचांनी समाधान व्यक्त करून समाधान पिंजारी यांचा आदर्श गावकऱ्यांनी घेऊन ही लढाई जिंकण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. यावेळी  निंबवडे गावच्या सरपंच नंदाताई देठे, पोलीस पाटील प्रवीण मंडले, आरोग्यसेवक संजय कदम, आरोग्यसेविका तळापे मॅडम, कोतवाल पोपट वाघमारे, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर उपस्थित होत्या.

गावात गेले अनेक दिवस कोरोना च्या विरुद्ध प्रशासकीय टीम मेहनत घेत आहे. आमच्या अनेक सहकाऱ्यांनी गावाला विविध मदत केली आहे. यातून प्रेरणा घेऊन वाढदिवस साजरा न करता हा खर्च या टीम च्या सुरक्षिततेसाठी वापरण्याचा निर्धार केला. या साठी मला पत्रकार राघव मेटकरी आणि मित्रांनी सहकार्य केले. यापुढे सुद्धा गावासाठी समाजकार्य करत राहू.
समाधान पिंजारीNo comments:

Post a Comment

Advertise