म्हसवड मध्ये विद्यार्थ्याना शालेय पोषण आहाराचा तांदूळ वाटप - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, April 20, 2020

म्हसवड मध्ये विद्यार्थ्याना शालेय पोषण आहाराचा तांदूळ वाटप


म्हसवड मध्ये विद्यार्थ्याना शालेय पोषण आहाराचा तांदूळ वाटप
माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड/अहमद मुल्ला : म्हसवड शहरातील पहिली ते आठवी मध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्याना शालेय पोषण आहाराचा शाळेत शिल्लक असलेला तांदुळ वाटप करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहे. त्यानुसार म्हसवड शहरातील सर्व  प्राथमिक माध्यमिक शाळा आपल्याकडे शिल्लक असलेला तांदुळ शाळेतील सर्व विद्यार्थ्याना वाटप करणार आहेत. याकरीता पालकांनी शाळेत येऊन गर्दी न करता आपल्या पाल्याचे नाव, वर्ग व मोबाईल नंबर  वर्ग शिक्षकाच्या मोबाईल वर पाठवणे. त्यानुसार शिक्षक प्रत्येक वर्गासाठी दिवस नेमुन देतील आणि नेमून दिलेल्या दिवशीच खबरदारीच्या आदेशाचे पालन करुनच नियमानुसार तांदुळाचे वाटप करण्यात येईल.
सिद्नाथ हायस्कूल म्हसवड मधिल इयत्ता पाचवी ते आठवी मध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्याचे नाव ,वर्ग व मोबाईल नंबर मु्ल्ला सर (9423489793) व भोते सर (8308328100 )य़ांचेकडे  त्वरीत नोद करावे व त्यानी सांगितलेल्या दिवशीच आपल्याला तांदुळ मिळेल याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी असे आवाहन प्राचार्य एम.जी नाळे यांनी केले आहे

No comments:

Post a Comment

Advertise