Type Here to Get Search Results !

स्पर्धा परीक्षांचा अभ्यासासाठी अभ्यासिका महत्वपूर्ण ; जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

फोटो ओळ :  कै. पद्मभूषण वसंतदादा पाटील स्मारक भवन, स्टेशन चौक, सांगली येथील जिल्हा ग्रंथालयाच्या अभ्यासिकेमध्ये अभ्यास करीत असलेले विद्यार्थी 

माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कार्यरत असणारी कै. पद्मभूषण वसंतदादा पाटील स्मारक भवन, स्टेशन चौक, सांगली येथील अभ्यासिका दि. 1 जानेवारी 2020 पासून सुरू करण्यात आली आहे. या अभ्यासिकेत प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात आले असून प्रवेश 1 वर्ष कालावधीसाठी दिला जाणार आहे. प्रवेश घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रासह जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, कै. पद्मभूषण वसंतदादा पाटील स्मारक भवन, स्टेशन चौक, सांगली येथे दि. 15 फेब्रुवारी 2020 पर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी कले आहे. 
या अभ्यासिकेमध्ये 75 विद्यार्थी व 50 विद्यार्थीनी अशी एकूण 125 विद्यार्थ्यांसाठी आसनव्यवस्था उपलब्ध आहे. सध्या 70 विद्यार्थी व 25 विद्यार्थीनीनी प्रवेश घेतलेला आहे. अभ्यासिकेमध्ये युपीएससी, एमपीएससी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस भरती, बँकींग इत्यादी अशा सर्व प्रकारची एकूण 1226 पुस्तके उपलब्ध आहेत. अत्यंत सुसज्ज व प्रशस्त अशा या अभ्यासिकेसाठी वार्षिक फी 500 रूपये असून अभ्यासिकेची वेळ सकाळी 8 ते रात्री 8 अशी आहे. प्रवेश घेण्यासाठी प्रवेश अर्जासोबत पदवी / पदवीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्राची (स्वयंसाक्षांकित प्रत), ओळखपत्र (आधारकार्ड / पॅनकार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स / मतदान ओळखपत्र), रहिवाशी पुरावा (मतदान ओळखपत्र, डोमेसाईल प्रमाणपत्र), दोन फोटो यासह संपर्क साधावा व आपले करियर घडवावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies