रविंद्र वस्त्र निकेतन च्या ‘आटपाडी फेस्टिवल’ ला मोठी गर्दी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, February 1, 2020

रविंद्र वस्त्र निकेतन च्या ‘आटपाडी फेस्टिवल’ ला मोठी गर्दी


फोटो ओळ : रविंद्र वस्त्र निकेतन सलगरे च्या आटपाडी फेस्टिवल धमाकेदार सुरुवात झाली असून ग्राहकांची मोठी गर्दी खरेदीसाठी होऊ लागली आहे.
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : रविंद्र वस्त्र निकेतन सलगरे च्या आटपाडी फेस्टिवल धमाकेदार सुरुवात झाली असून ग्राहकांची मोठी गर्दी खरेदीसाठी होऊ लागली आहे. जिल्ह्यांतील सलगरे येथील प्रसिद्ध रविंद्र वस्त्र निकेतनच्या फ्रान्चाईजी स्टोअर भिंगे वस्त्र निकेतन च्या वतीने आटपाडी फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 30 जानेवारी ते 3 फेब्रुवारी पर्यंत सदरचा फेस्टिवल सुरु राहणार आहे. 
यामध्ये खास महिलांसाठी ३०० रु. ला २ नग गाऊन, ५०० रु. ला ५ नग लेगिंग, ५०० रु.ला ५ नग कुर्ती, ६०० रु. ला ५ नग साडी, १००० रु.ला ५ नग डिझाईनर साडी, तर ५०० रु. ला २ नग ड्रेस मटेरियल मिळणार आहेत. यामध्ये ऑफर म्हणून रोज सकाळी प्रथम येणाऱ्या 25 महिलांना फक्त ५० रुपयात फक्त एका महिलेला एक परकर देण्यात येणार आहे. 
तर पुरुषांसाठी १००० रु. ला ४ नग जेन्ट्स शर्ट, ५०० रु. ला ३ नग बॉईज पँन्त/शर्ट, ५०० रु.ला ५ नग टी-शर्ट, १००० रु.ला ३ नग कॉटन ट्राऊझर, व १००० रु. ला ३ नग फॅन्सी जिन्स मिळणार आहे. त्याचबरोबर रोज सकाळी प्रथम येणाऱ्या १५ पुरुषांनाही कॉटन कॅण्डी चा एका पुरुषाला एक टी-शर्ट देण्यात येणार आहे. 
आटपाडी शहरामध्ये प्रथमच कपड्यांचे “आटपाडी फेस्टिवल धमाका” सुरू झाल्याने याकडे आटपाडी तसेच तालुक्यातील गावातील नागरिक कपडे घेण्यासाठी गर्दी करू लागले आहेत. ब्रॅण्डेड कंपन्यांचे कपडे किफायतशीर दारामध्ये मिळू लागल्याने  श्रीमंता बरोबरच गोरगरीब ह्या फेस्टिवल कडे आकर्षित होऊ लागले आहेत. सदरचा फेस्टिवल हा सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत सुरू असून या फेस्टिवलला भेट देण्याचे आवाहन रवींद्र वस्त्र निकेतनचे फ्रॅंचाईजी स्टोअर भिंगे वस्त्र निकेतन यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment

Advertise