रविवारी शेटफळे येथे रणजितसिंह पाटील यांचे व्याख्यान ; युवकांशी ते थेट संवाद साधणार ; ध्येयदेशी प्रेरणा ग्रुपच्या वतीने आयोजन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, February 1, 2020

रविवारी शेटफळे येथे रणजितसिंह पाटील यांचे व्याख्यान ; युवकांशी ते थेट संवाद साधणार ; ध्येयदेशी प्रेरणा ग्रुपच्या वतीने आयोजन


माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : ध्येयदेशी प्रेरणा ग्रुपच्या वतीने युवकांना दिशा व प्रेरणा देण्यासाठी यशस्वी उद्योजक व रक्षक ग्रुपचे प्रमुख रणजितसिंह पाटील व सुनिता रणजितसिंह पाटील यांचे व्याख्यान रविवार दि. 2 फेब्रुवारी रोजी शेटफळे ता. आटपाडी जि. सांगली येथे आयोजित करण्यात आली असून या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. 
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या औचित्याने सदर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास आटपाडी तालुक्यातील यशस्वी उद्योजक व पुणे येथील रक्षक ग्रुपचे प्रमुख रणजितसिंह पाटील व सुनिता रणजितसिंह पाटील यांच्या यशस्वी उद्योगाचा संघर्षमय प्रवास त्यांच्या व्याख्यानातून ऐकायचं मिळणार आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमात युवकांशी ते थेट संवाद साधणार आहेत. शेटफळे येथील जोगेश्वरी मंदिरासमोरील पटांगणामध्ये सायंकाळी  ५.३० ला सदरचा कार्यक्रम होणार आहे. 

No comments:

Post a Comment

Advertise