सदाशिवनगर येथे रक्तदान शिबिर संपन्न - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, February 1, 2020

सदाशिवनगर येथे रक्तदान शिबिर संपन्न

रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना धैर्यशील मोहिते-पाटील व उपस्थित मान्यवर 
माणदेश एक्सप्रेस न्युज
सदाशिवनगर : जिव्हाळा फाऊंडेशन सदाशिवनगर यांच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त व सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या १०२ व्या जयंतीचे औचित्य साधून रक्तदानाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १२७ रक्तदात्यांनी आपला रक्तदानाचा हक्क बजावला.
 या शिबिराचे उद्घाटन धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अक्षय ब्लड बँक माळशिरस चे डॉ. वाघमोडे व  तन्वीर शेख प्रमुख उपस्थित होते. जिव्हाळा फाउंडेशनचे अध्यक्ष हुसेन मुलाणी, उपाध्यक्ष जगदीश राजमाने, ज्ञानदेव ढोबळे, हणमंत धाईंजे, दीपक दिक्षित, प्रशांत दोशी, ज्ञानेश राऊत, सागर महामुनी, दीपक मोहिते, पैगंबर मुलाणी, दत्तात्रय सोनटक्के, पांडूरंग ढगे, संजय मोहिते, विपुल रणवरे, सागर पालवे, हरी पालवे या सर्वांनी रक्तदानासाठी परिश्रम घेऊन कार्यक्रम पार पाडला यावेळी 127 रक्तदात्यांनी रक्तदान केले त्या सर्वांचे आभार फाउंडेशन तर्फे मानण्यात आले. कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. जगताप व कर्मचारी यांचे कार्यक्रमास सहकार्य लाभले.No comments:

Post a Comment

Advertise