आपल्या हातून योग्य कार्य व्हावे ; ह.भ.प.प्रल्हाद महाराज यादव - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, February 1, 2020

आपल्या हातून योग्य कार्य व्हावे ; ह.भ.प.प्रल्हाद महाराज यादव

  वांगी ता.कडेगाव येथील शंकर पाटणकर आण्णा यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त किर्तनकार ह.भ.प.  प्रल्हाद यादव महाराज किर्तन करताना
माणदेश एक्सप्रेस न्युज
कडेगाव/वार्ताहर : नव्या पिढीला चांगले ज्ञान आणि संस्कार द्यावे. या विज्ञानाला अध्यात्माची जोड देणे आवश्यक आहे. जीवनात हित करायचे असेल तर आपल्या हातून वाईट कार्य होऊ नये यासाठी आपल्या हातून योग्य कार्य झाल्याशिवाय पर्याय नाही असे आवाहन ह.भ.प.प्रल्हाद महाराज यादव यांनी केले.
वांगी (ता.कडेगाव )येथील शंकर जगन्नाथ पाटणकर आण्णा यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त  आयोजित किर्तनकार  ह.भ.प.प्रल्हाद यादव महाराज यांच्या किर्तनाच्या माध्यमातून मुलांनी कसे आचरण करावे तसेच आई वडिलांची सेवा करुन वारी पुण्यनामस्मरणातील मार्गाविषयी सल्ला दिला.
यावेळी प्रल्हाद महाराज म्हणाले की, आजची तरुण पिढी व्यसनाधीन झाल्याने शोकांतिका आहे. संत पुरुषांचा आदर्श तरुणाईमध्ये आला पाहिजे. पुण्य नामस्मरणाने पुण्य प्राप्त करता येते. ज्याच्या घरातील आई वडिलांच्या चेहऱ्यावर हसू, समाधानी असते तेच घर सुखी असते. तसेच सुखी समाधानी जीवनासाठी मुलांनी नैतिक मर्यादा पाळल्या जावेत. असे यादव महाराज यांनी सांगितले. 
यावेळी सरपंच डॉ विजय होनमने, सतिश झेंडे महाराज, बाबासो सुर्यवंशी, संजय कदम, राहुल सांळुखे तसेच वांगी गावातील तरुण मित्र मंडळ व पाहुणे मंडळी उपस्थित  होते. श्रोत्यांची प्रचंड गर्दी होती. आभार दत्तात्रय पाटणकर यांनी केले.
No comments:

Post a Comment

Advertise