पोलिसांना खबर देतो का म्हणून तलवारीने केला वार ; दोन जणांविरूद्ध गुन्हा. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, January 6, 2020

पोलिसांना खबर देतो का म्हणून तलवारीने केला वार ; दोन जणांविरूद्ध गुन्हा.


माणदेश एक्सप्रेस न्यूज 
सोलापूर प्रतिनिधी : तू पोलिसांना आमच्याबद्दल खबर देतो का आता तुला खल्लास करतो तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणून तलवार काढून मानेवर वार केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध सलगर वस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी ईश्वर नागनाथ गायकवाड (वय-३५) रा. सेटलमेंट फ्री कॉलनी नं ६, सोलापूर हे व फिर्यादीचे भावजी अंबादास राम जाधव असे दोघे फिर्यादीच्या थोबडे वस्ती  येथील  कंपनी कनस्ट्र क्शन च्या ऑफिस मध्ये घुसले. व त्यानंतर आरोपी रजाक गफुर शेख याने हातात असलेली तलवार फिर्यादीच्या दिशेने घेऊन घेऊन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केला.त्यावेळी त्याने तू पोलिसांना खबर देतो का आमची असे म्हणून तुला आता खल्लास करतो व जिवंत सोडणार नाही असे म्हणाला. व त्यानंतर जीव घेण्याच्या उद्देशाने हातातील लोखंडी तलवारीनेे फिर्यादीच्या मानेवर वार केला. व तो वार फिर्यादीने चुकून फिर्यादी तेथून पळून जात असताना आरोपी रमजान गफुर शेख बियाणे रस्त्यावरील दगड उचलून फिर्यादीच्या दिशेने फेकला. व तो दगड फिर्यादीच्या पाठीला लागला. आरोपीने फिर्यादीने लावलेली मोटार सायकल वर दगड घालून गाडीचे सहा हजार रुपयांचे नुकसान केले. ही घटना दि. ४ जानेवारी रोजी घडली. या घटनेची नोंद सलगर वस्ती पोलिस ठाण्यात झाली असून, या घटनेचा पुढील तपास मपोसई सुतार हे करित आहेत.
No comments:

Post a Comment

Advertise