विवाहितेला सोन्याची मागणी करून शारीरिक व मानसिक छळ ; पतीसह सासू-सासर्यायवर गुन्हा. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, January 6, 2020

विवाहितेला सोन्याची मागणी करून शारीरिक व मानसिक छळ ; पतीसह सासू-सासर्यायवर गुन्हा.


माणदेश एक्सप्रेस न्यूज 
सोलापूर प्रतिनिधी : विवाहितेला सोन्याची मागणी करून व घरातील जास्त कामे लावून शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासू सासर्यां ना विरुद्ध जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी भाग्यश्री स्वप्निल पवार (वय-२७) रा. ६५/१ शिवगंगा मंदिराजवळ भवानी पेठ सोलापूर हिला वेळोवेळी सोन्याची मागणी करून घरातील सर्व कामे सासरकडील लोक लावत होते. व तसेच शेळी यांना खाण्यास देऊन अपमानास्पद वागणूक देऊन शारीरिक व मानसिक छळ करत होते. असे भाग्यश्री पवार यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत आरोपींविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेचा पुढील तपास पोसई मांजरे हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise