माणदेश एक्सप्रेस न्यूज नांदेड प्रतिनिधी : जिल्हा परिषद हायस्कूल,कोसमेट ता.किनवट जि. नांदेड येथे कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष, अभ्यासू व विद्यार्थीप्रिय शिक्षक कैलास नकुले हे युजीसी मार्फत घेण्यात आलेल्या प्राध्यापक पात्रता परीक्षेतशिक्षणशास्त्र (education) या विषयात उत्तीर्ण झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.या यशाबद्दल मुख्याध्यापक श्री.गुंड सर,सहकारी शिक्षक श्री.खैरनार सर,श्री.जाधवसर,श्री.कदम सर, श्री.गालचलवार सर,श्री.जावेद आदमनकर सर, श्री.कोट्गिरे सर, श्री.गणेश कोकुलवार सर,श्री.श्याम रायवार सर, श्री.अरुण पटिल सर,विजय वाठोरे यांच्यासह सर्वच शिक्षक ,कर्मचारी,मित्रपरिवारा कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.या यशाचे श्रेय कैलास नकुले यांनी त्यांच्या शिक्षक, शुभचिंतक,सहकारी व मित्रपरिवाराला दिले आहे.