अकलूजमध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारल्याने मला खूप आनंद झाला आहे-किरण साठे. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, January 2, 2020

अकलूजमध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारल्याने मला खूप आनंद झाला आहे-किरण साठे.


माणदेश एक्सप्रेस न्यूज 
अकलूज प्रतिनिधी : अकलूजमध्ये महात्मा फुले यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण करून त्यांच्या शेजारी सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभा करावे या मागणीसाठी पूर्वीचे मनसे जिल्हाउपाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान  जिल्हा सरचिटणीस यांनी वेळोवेळी आंदोलने करून व पाठपुरावा केल्याने महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे एकत्र स्मारक उभारण्यात आले आहे.त्या स्मारकाचा सुशोभीकरण व अनावरनाचा कार्यक्रम उद्या होत आहे,माझ्या प्रयत्नाला यश मिळाले आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी सांगितले.

अकलूजमध्ये फक्त महात्मा फुले यांचे स्मारक होते,त्याचेही सुशोभीकरण करण्यात आले नव्हते तसेच अकलूजमध्ये असलेल्या महात्मा फुले यांच्या स्मारकाशेजारी सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभा करण्यात यावे व दोन्ही महामानवाच्या स्मारकाचे सुशोभीकरण करावे या मागणीसाठी  गेली ८ ते १० वर्ष पूर्वीचे मनसे जिल्हाउपाध्यक्ष व  राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी अकलूज ग्रामपंचायत यांच्याकडे आंदोलने करून पाठपुरावा केला आहे,माझ्या मागणीची दखल घेऊन अकलूज ग्रामपंचायत ने महात्मा फुले व सावित्रीबाई फुले याचे स्मारक उभा केल्याने मला खूप आनंद झाला आहे,त्याच प्रमाणे मी केलेल्या आंदोलनामुळे व पाठपुराव्याने हे स्मारक उभा राहिल्याचे समाधान वाटत आहे,तसेच अकलूज ग्रामपंचायत ने किरण साठे यांनी केलेली मागणी योग्य होती,हे ग्रामपंचायत ने सिद्ध केले आहे,असेही किरण साठे यांनी सांगून अकलूज ग्रामपंचायत चे आभार मानले आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise