स्वेरीच्या डिप्लोमामध्ये बीट्स २०१९ चे थाटात संपन्न. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, January 2, 2020

स्वेरीच्या डिप्लोमामध्ये बीट्स २०१९ चे थाटात संपन्न.

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
पंढरपूर प्रतिनिधी : येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्याच्या हक्काचे व्यासपीठ असलेल्या व कलागुणांची मुक्त उधळण असलेल्या ‘बीट्स २०१९-२०’ हा सांस्कृतिक कार्यक्रम थाटात संपन्न झाला.
       यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून द.ह. कवठेकर विद्यालयाचे व्ही. वाय. पाटील, एस.एस. दिवान आणि एन. जी. कुलकर्णी हे लाभले होते तर स्वेरीचे माजी विद्यार्थी सुरज डोके, योगेश वसेकर,प्रदीप अनपट यांची विशेष उपस्थिती होती तर कार्यक्रमाला पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठपोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी भेट दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी सुनिल जोशी होते. यावेळी व्ही. वाय. पाटील यांनी स्वेरीच्या शिस्तीचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणाना वाव देण्यासाठी अशा सांस्कृतिक कार्यक्रमाची गरज आहे असे म्हणाले. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना जोशी विद्यार्थ्याना म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांची श्रीमंती ही त्यांच्याकडे असलेल्या संपत्ती वरून दिसत नाही, गाड्या, बंगला यावरूनही दिसत नाही तर दिसते ती त्यांच्याकडे असलेल्या आत्मविश्वासातून.’ असे सांगून त्यांनी कवी अरुण म्हात्रे यांची ‘खिसे होते फाटलेले.....’ ही वास्तविक कविता सादर केली. असे सांगून अभियंत्यांवर उद्याचा  देश अवलंबून आहे. यासाठी तळमळीने शिक्षण घ्या. येथील शिक्षण खूप महत्वाचे आहे. असे सांगितले. विश्वस्त प्रा. सुरज रोंगे उपस्थिताना मार्गदर्शन करताना म्हणाले की, ‘भविष्यात करिअर करताना प्रचंड परिश्रम करा. आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात आपला आत्मविश्वास कमी होऊ देवू नका.’ असे सांगून शिक्षणातील आव्हाने स्पष्ठ केली. गणेश वंदना, खेळ मांडला, पिंगा नृत्य, देश रंगीला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर ऐतिहासिक नाटक, लेझी नृत्य, मुलगी वाचवा देशप्रेमावर आधारित गीत असे विविध नृत्य मिमिक्री पहावयास मिळाले. सर्व प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमात विविध कलागुणांची मुक्त उधळण केली गेली. त्यात हिंदी-मराठी भाषेतील नव्या व जुन्या गाण्यांचा समावेश देखील होता. पारंपारिक वेशभूषेपासून ते सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम संपेपर्यंत सूत्रसंचालनापासून ते सांस्कृतिक कार्यक्रमातील विविध नाट्यछटा सादर करेपर्यंत विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात शिस्त पाळली. त्यात नेत्रदीपक विद्युत रोषणाई, कर्णमधुर संगीत यांच्या मिलापाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. एन.डी.मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली डिप्लोमाच्या प्राध्यापकांच्या सहकार्याने सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी झाला. यावेळी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. सुनील भिंगारे यांच्यासह विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. पार्वती पाटील, शर्वरी गोडगे, चैताली बंडगर, गीतांजली म्हमाणे, दीप्ती कदम सिमरन मुजावर, राजनंदिनी पवार, ज्योती लिगाडे, श्रुष्टी जगदाळे व इतर विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले.

No comments:

Post a Comment

Advertise