अभिनयधारा कला संस्थेचे स्नेह संमेलन कलावंतांच्या उपस्थितीत संपन्न. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, January 3, 2020

अभिनयधारा कला संस्थेचे स्नेह संमेलन कलावंतांच्या उपस्थितीत संपन्न.

                               
माणदेश एक्सप्रेस न्यूज 
भांडूप प्रतिनिधी :   अभिनयधारा कला संस्थेचे स्नेह संमेलन  दि. ०१ जानेवारी ला बॅरिस्टर नाथ पै विद्यालय भांडुप येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते दिगंबर नाईक, सिनेतारखा प्रतिभा शिंपी,  सुप्रसिद्ध अभिनेत्री आशा ज्ञाते, संगीतकार अनिल करंजवकर, सिने-नाट्य दिग्दर्शक, पत्रकार  महेश्वर तेटांबे ,नुकत्याच सुरू असणाऱ्या  राजा रानीची गं जोडी मालिकेचे दिग्दर्शक स्वप्नील वारके, स्टंट मास्तर रतन बोस, नाटककार विश्वास धुमाळ, म्हाळगी प्रकाशनचे मिलिंद चाळके, देसाई ऑप्टिकल'चे शाम देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते. संस्थेचे अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की अभिनयधारा कला संस्था ही भांडुप मधील कलाकारांची मातृसंस्था आहे. माता ही सदैव संस्कार करण्याचे काम करत असते, म्हणून अभिनयधारा'ने स्पर्धात्मक उपक्रमांमध्ये न अडकता, कलाकारांवर संस्कार घडविण्याच्या कार्यात स्वतःला झोकून द्यावे, अशी इच्छा व्यक्त केली. हौशी,  नौशी कलावंतांची तसेच नव्याने उदयास येणारे नवोदित कलावंत यांना शुध्द भाषा ही अडचणच असते म्हणून संस्थेमार्फत रविवार दि.१९ जानेवारी २०२० रोजी मराठी भाषा याविषयावरील एका अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यांत येणार असून या साठी सुप्रसिद्ध अभिनेते आणि व्हिजन व्हॉइस अँड ऍक्ट चे संचालक श्रीनिवास नार्वेकर हे मार्गदर्शन करणार आहेत तेव्हा जास्तीत जास्त इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही करण्यात आले आहे.
स्नेहसंमेलनाच्या उत्तरार्धात मनोरंजनाच्या कार्यक्रमात अभिनेते दिगंबर नाईक यांनी प्रेक्षकांना हसवता हसवता अनेक प्रसंगांच्या आठवणी सांगितल्या, अभिनेत्री प्रतिभा शिंपी यांनी आपल्या गायकीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले तर आशा ज्ञाते , महेश्वर तेटांबे यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. अविरत साळवी, सुनील खोबरेकर, योगेश पाटील, सुनील सावंत, संतोष दळवी, शेखर कवळे, तुकाराम पवार, अर्जुन चिंदरकर, पंचेष खडपे, विकास घाडे, दिवाकर बिरमोळे, अनघा बेंद्रे, विनोद पवार, विनायक घाटे, गजानन थोरात आदी कलाकारांनी प्रेक्षकांना मनोरंजनाच्या कार्यक्रमाची उत्तम मेजवानी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तन्वी मोरे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदीप सुर्वे, सुरेश कदम, निलेश रासम, विजयलक्ष्मी सूर्यवंशी, दिलीप साळुंखे, प्रशांत दुधवडकर, मिलन करंजवकर, सुनील सुर्वे, राजेंद्र शिर्के, अमोल पांचाळ यांनी विशेष मेहनत घेतली, अशी माहिती संस्थेचे सचिव दिलीप वाईरकर यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Advertise