Type Here to Get Search Results !

नांदेड जिल्हा संबंध महाराष्ट्रात प्राथमिक शिक्षणात लक्षवेधी आहे- श्री व्यंकटेश चौधरी.

    
माणदेश एक्सप्रेस न्यूज 
नांदेड –प्रतिनिधी : अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंच शाखा नांदेड आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त " ज्ञानदीप ई विशेषांक"  ऑनलाईन प्रकाशन सोहळा अत्यंत थाटामाटात व हर्षवर्धक वातावरणात पार पडला.
                 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ज्ञानदीप ई विशेषांक ऑनलाईन प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्षस्थान अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंच, महाराष्ट्रचे राज्याध्यक्ष श्री नटराज मोरे सर हे होते.या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती ही नांदेड जिल्ह्यातील शिक्षण विस्तार अधिकारी तसेच प्रसिद्ध साहित्यिक मा.श्री व्यंकटेश चौधरी सर व राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक व नांदेड जिल्हाध्यक्ष तथा साहित्यिक मा.श्री रमेश मुनेश्वर हे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून करण्यात आली. मा ना सा येवतीकर यांनी आपल्या आपल्या आगळ्या वेगळ्या अन बहारदार शैलीत सूत्रसंचालन करत सर्वांचे लक्ष कार्यक्रमात आकर्षून घेण्यात यश मिळविले.यानंतर अध्यक्षांचे स्वागत नांदेड मंच चे सचिव मिलिंद जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नांदेड जिल्ह्यातील शिक्षण विस्तार अधिकारीव साहित्यिक श्री व्यंकटेश चौधरी सर यांचे स्वागत विजय वाठोरे यांनी केले.तसेच राज्य आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक रमेश मुनेश्वर यांचे स्वागत चंद्रकांत कदम यांनी केले.
      यानंतर सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंच कडून ज्ञानदीप 2020 ई विशेषांकाचे राज्याध्यक्ष श्री नटराज मोरे, साहित्यिक तथा कवी श्री व्यंकटेश चौधरी आणि जिल्हाध्यक्ष श्री रमेश मुनेश्वर यांच्या हस्ते झाले ऑनलाईन प्रकाशन करण्यात आले. ज्ञानदीप या ई विशेषांकाचे निर्माते जिल्हा सचिव मिलिंद जाधव यांनी प्रास्ताविक पर दोन शब्द मांडले.तदनंतर शिक्षकांच्या कला गुणांना वाहिलेला अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंच ,महाराष्ट्र शाखा नांदेड च्या वतीने ई विशेषांक हा पहिलाच अंक भारताच्या थोर सुपुत्री क्रांतीज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले यांच्या जयंती निमित्य आपल्या हातात देताना आम्हास अत्यानंद होत आहे. देशात डिजिटल इंडिया चा प्रत्यय  येत असतांनाच महाराष्ट्रातील प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत शिक्षण क्षेत्रातील  विविध डिजिटल प्रयोग वर्गापासून WORLD क्लासरूम पर्यंतचे उपक्रम व शिक्षकांचे शिक्षकांसी होणारी डिजिटल माध्यमातून होणारी आंतरक्रिया दिवसेंदिवस वाढत असताना दिसत आहे. त्याचीच प्रचिती अशा माध्यमातून होत आहे. मा.नटराज मोरे संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंच ,महाराष्ट्र यांचा शिक्षकांचे  विविध साहित्य , कला व क्रीडा विषयीचेगुण वाढीस लागावी , त्यांच्या ज्ञानाचा उपयोग इतरानाही व्हावा या व अशा इतर उध्येशाने तयार केलेल्या या सृजनशील संघटनेच्या शाखा जिल्ह्या जिल्ह्यात कार्यरत आहेत . शिक्षकांच्या विविध कलाकृतीचे कुठेतरी संकलन व्हावे .त्यातून निक्खळ आनंद मिळावा ,सृजनशीलतेचा विकास व्हावा अशा विविध कल्पनेतून ई विशेषांकाचा जन्म झाला.तंत्रस्नेही शिक्षक मिलिंद जाधव व स्तंभलेखक नासा येवतीकर यांच्या प्रयत्न या विशेषांकात आवर्जन पहावयास मिळतील. या उपक्रमासाठी जिल्हा भरातील व बाहेर जिल्ह्यातीलही  अनेक शिक्षकांनी प्रतिसाद दिला. त्यांच्या प्रतीसादानेच हे कार्य होऊ शकले. या कार्यासाठी झटत असलेले सर्वजन निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत. पहिल्या वहिल्या या प्रयत्नात असंख्य चुका असतील तरी वाचकांनी या इ विशेषांकाचा  स्वीकार करावा असे मुनेश्वर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
              आपल्या मुलीला शिकवा, ती आपल्या स्वतः पुरता विचार न करता आपल्या कुटुंबाचाही विचार करते व घरातील सर्वाना शिक्षण देण्याचा विचार करू शकते. शिकलेली आई घरादाराला पुढे नेई असे म्हटले जाते ते काही उगीच नव्हे.आजचा हा ऑनलाईन ज्ञानदीप विशेषांक पाहून नांदेड जिल्हा संबंध महाराष्ट्रात प्राथमिक शिक्षणात लक्षवेधी आहे, याचा हा साक्षात अनुभव घेता आला असे प्रतिपादन नांदेड जिल्ह्यातील शिक्षण विस्तार अधिकारी श्री व्यंकटेश चौधरी यांनी केले.व सर्व टीम ला शुभेच्छा दिल्या.आभारप्रदर्शन श्री मिलिंद जाधव यांनी केले.
           " ज्ञानदीप इ विशेषांक " निर्मितीसाठी संपादक रमेश मुनेश्वर सर , ना सा येवतीकर सर तसेच तंत्रस्नेही शिक्षक मिलिंद जाधव सर यांचे यांचे विशेष योगदान आहे.सदर विशेषांकात महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक व नवकवी,लेखक यांच्या वैचारिक लिखाणाचा व सुंदर व आकर्षक पेंटिंग तसेच फोटोग्राफीचा संग्रह यात पहावयास मिळेल.सदर कार्यक्रमास मा.व्यंकटेश चौधरी,मा. रमेश मुनेश्वर, मा.नटराज मोरे, मा.ना सा येवतीकर, मा.विजय वाठोरे,  मा.मिलिंद जाधव, नंदकुमार ओतारी, परभणकर, विजया तारू, प्रल्हाद जोंधळे  व अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंच समूहातील अन्य मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies