बोरगाव जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांचा मनमानी कारभार. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, January 3, 2020

बोरगाव जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांचा मनमानी कारभार.

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
गेवराई प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बोरगाव जुने,केंद्र गुळज ता.गेवराई जि. बीड येथील शाळेत शिक्षकांची मनमानी सुरू आहे. शाळेचे मुख्याध्यापक पालवे सर दररोज गैरहजर राहतात व वेळेवर हजर होत नसल्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पालकांनी सतत तक्रार देऊन सुद्धाही भोंगळ कारभार सूरूच आहे. टपालाच्या नावा खाली सुट्या मारणे सुरूच आहे.गट शिक्षण  अधिकारी साहेबांनी तक्रार दाखल करून घ्यावी ही विनंती  पालकाच्या वतीने करण्यात येत आहे . कृपया शाळेला भेट देऊन शाळेची पाहणी करावी व मुलांचे शैक्षणिक नुकसान होण्यापासून वाचवावे असे आवाहन समस्त पालकवर्ग करत आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise