Type Here to Get Search Results !

माजी आमदार माने कडून बाजार समिती संचालकाला धमकी.



माणदेश एक्सप्रेस न्यूज 
सोलापूर प्रतिनिधी : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा माजी आमदार दिलीप माने यांनी व वैमनस्यातून वगैरेवर प्रकरणी आरोप असलेल्या कर्मचार्यांनच्या निर्मितीस विरोध केल्याच्या रागातून भरसभेत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून संचालक श्रीमंत नारायण बंडगर (वय-४५) रा. पाथरी तालुका उत्तर सोलापूर यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की कृषी उत्पन्न बाजार समितीत ३९ कोटी रुपयांचा गैरव्यवहार व फसवणूक केल्याप्रकरणी २०१८ मध्ये संचालक श्रीमंत बंडगर यांनी तक्रार केली होती.या तक्रारीची दखल घेऊन संचालक आणि तत्कालीन लिपिक उमेश दळवी यांच्यावर शासनातर्फे कारवाई करण्यात आली होती.सोलापूर जिल्हा न्यायालयाने आरोपी असलेल्या संचालकांचा जामीन फेटाळला होता.त्यानंतर सर्वांनी उच्च न्यायालयातून जामीन मिळविला आहे.तर दळवी यांचाही जामीन मंजूर करण्यात आला होता.त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सचिव म्हणून शासनाकडून व्यक्तीची नेमणूक करण्यात आली होती.त्यांचा दोन वर्षाचा कार्यकाळ संपल्याने व पुन्हा मुदतवाढ मिळून शकल्याने त्यांना पदावरून कमी करण्यात आले आहे.त्या रिक्त पदावर सुमारे पंधरा दिवसांपूर्वी उमेश वळवी यांना सभापती माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी प्रभारी सचिव म्हणून पदभार दिला आहे.व यांचे निवडणुकीनंतर गुरुवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पहिलीच बैठक आयोजित करण्यात आली होती.या सभेत गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या दळवी यांच्या निवडणुकीत बंडगर यांनी हरकत घेतली.आणि त्यांच्याकडे प्रभारी सचिव पदाचा पदभार देण्यास विरोध केला. त्यामुळे चिडलेल्या माजी आमदार दिलीप माने त्यांच्यासमोरील पॅड फेकुन मारला.त्यानंतर सभागृहाच्या बाहेर कसा पडतो तुला आता सोडत नाही.असे म्हणून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली.यावेळी माजी पालकमंत्री तथा सभापती विजयकुमार देशमुख तसेच इतर संचालक सभागृहात उपस्थित होते.त्यामुळे माझ्या आणि माझ्या कुटुंबाला माजी आमदार माने त्यांच्यापासून धोका असल्याने संरक्षणाची मागणी बंडगर यांनी केली आहे.याप्रकरणी संचालक बंडगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून माजी आमदार दिलीप माने विरुद्ध जेलरोड पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक करंडे करीत आहेत.

आमच्या दैनिक माणदेश एक्सप्रेस Whats App Group मध्ये Join होण्यासाठी Click करा.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies