चायनीज व सिगारेट फुकट दिली नाही म्हणून लाकडाने मारहाण; चार जणांविरुद्ध गुन्हा. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, January 3, 2020

चायनीज व सिगारेट फुकट दिली नाही म्हणून लाकडाने मारहाण; चार जणांविरुद्ध गुन्हा.


माणदेश एक्सप्रेस न्यूज 
सोलापूर प्रतिनिधी : चायनीज व सिगरेट फुकट दे या कारणावरून एका २६ वर्षाच्या तरुणास लाकडाने व हाताने मारहाण केल्याची घटना जोडभावी पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी प्रशांत भारत डावरे (वय-२६) रा. भवानी पेठ,मड्डी वस्ती,सोलापूर याचा वैष्णवी हाऊस व चायनीज चा गाडा आहे.आरोपी अशोक कांबळे,दादा कांबळे,सिकंदर कांबळे,सिद्धा कांबळे हे सर्व जण टी हाऊस वर येवून चायनीज व सिगारेट फुकट दे असे बोलत होते.त्यावेळी फिर्यादीने मी काही फुकट देणार नाही याच्यावर माझे पोट आहे. असे आरोपींना सांगितले. त्यावेळी फिर्यादी व फिर्यादीच्या कामगारास या सर्व आरोपींनी मिळून शिवीगाळ केली. त्यावेळेस फिर्यादी प्रशांत डावरे हे आरोपींना समजून सांगत होते. त्यानंतर आरोपींनी सिगारेट फुकट दे नाही तर दुकान बंद कर अशी दमदाटी करून व शिवीगाळ करून फिर्यादीचा कामगार बंडू राठोड व फिर्यादी लाकडाने हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादी चे वडील हे भांडण सोडवित असतांना मध्ये आले असता त्यांनादेखील लाकडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.ही घटना दि.३१ डिसेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास जुना तुळजापूर नाका येथे घडली. याबाबत आरोपीविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक मनोहर हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise