कारखान्यावरचा पत्रा तोडून ३९ हजार रुपयांची केबल वायरची चोरी. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, January 3, 2020

कारखान्यावरचा पत्रा तोडून ३९ हजार रुपयांची केबल वायरची चोरी.

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
सोलापूर प्रतिनिधी : कारखान्या च्या वरील बाजूचा पत्रा तोडून कारखान्यांमधील असलेले ३९ हजार रुपये किमतीचे केबल वायर ची कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी रफिक लियाकत शेख (वय-४५) रा.ए/१२८, आसरा हाउसिंग सोसायटी,होटगी रोड, सोलापूर यांचे लिबर्टी स्ट्रक्चरल फॅब्रिकेशन वर्क्स हा कारखाना आहे. या कारखान्याच्या वरील बाजूचा सिमेंटचा पत्रात तोडून कोणीतरी अज्ञात चोरट्याने प्रवेश केला. व त्यानंतर कारखान्यातील फिर्यादीच्या ३९ हजार पाचशे सत्तर रुपयाचा स्क्रॅप केबल वायर चोरून नेला. व कारखान्यातील असलेले वेल्डिंग मशीन गॅस गेज, गॅस कटर,कॉम्प्युटरचे मॉनिटर वेल्डिंग वायर केबल असे मिळून २५ हजार रुपयाचे नुकसान देखील केले. ही घटना दि १९ ऑक्टोंबर रोजी घडली. या घटनेची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात झाली असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक राठोड हे करीत आहेत.


No comments:

Post a Comment

Advertise