समाजाच्या विकासात पत्रकारांचे मोलाचे योगदान सभापती डॉ.भुमिका बेरगळ. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, January 7, 2020

समाजाच्या विकासात पत्रकारांचे मोलाचे योगदान सभापती डॉ.भुमिका बेरगळ.


माणदेश एक्सप्रेस न्यूज                                                                                                                               आटपाडी प्रतिनिधी : समाजाच्या विकासात पत्रकारांचे मोलाचे योगदान असल्याचे मत पंचायत समितीच्या सभापती डॉ. भूमिका बेरगळ यांनी व्यक्त केले .आटपाडी येथे आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमास माजी सभापती हर्षवर्धन देशमुख ,उपसभापती रुपेश कुमार पाटील, जिल्हा परिषद सदस्य मोहन रणदिवे, माणगंगा कारखान्याचे उपाध्यक्ष भगवानराव मोरे, गटविकास अधिकारी मधुकर देशमुख, पोलीस निरीक्षक बजरंग कांबळे पत्रकार सादिक खटिक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी स्वागत प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार निचळ यांनी केले. यावेळी बोलताना सभापती डॉ.बेरगळ म्हणाल्या की आजच्या काळात प्रशासन व अधिकारी यांच्याबरोबर पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे. शासन पातळीवर होणाऱ्या विविध विकास कामांसाठी पत्रकारांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले .माजी सभापती हर्षवर्धन देशमुख म्हणाले पत्रकारांच्या पाठिंब्यामुळेच राजकारणात पदार्पण केले व सभापती चा कार्यकाळ पार पडला यापुढेही पत्रकार संघाच्या सर्व उपक्रमांना सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. ज्येष्ठ पत्रकार सादिक खाटीक यांनी तालुक्यातील पत्रकारितेच्या वाटचालीचा आढावा घेऊन सध्याच्या काळात पत्रकारितेच्या क्षेत्रात असणारे अडचणींवर चर्चा केली. भाजपचे युवा नेते स्नेहजीत पोतदार यांनी माध्यमांच्या क्षेत्रात काम करताना पत्रकारांनी स्वतःच्या आरोग्य बाबत जागरूक राहावे असे सांगितले त्याचबरोबर समाजातील चांगल्या व वाईट कामांचे प्रतिबिंब कामातून उमटावे अशी अपेक्षा व्यक्त केली. गटविकास अधिकारी श्री मधुकर देशमुख यांनी प्रशासनामध्ये काम करीत असताना अधिकारी व पदाधिकारी यांचा पत्रकारांशी सुसंवाद असणे आवश्यक आहे. पत्रकारांच्या सहकार्य असेल तर विविध शासकीय योजना लोकांच्या पर्यंत पोहोचणे शक्य होते यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार किशोर पुजारी यांनी केले कार्यक्रमास आर.पी.आय .तालुकाध्यक्ष राजेंद्र खरात, माजी पंचायत समिती सदस्य आण्णा रणदिवे, उत्तम बालटे आदी उपस्थित होते आभार पत्रकार सतीश भिंगे यांनी व्यक्त केले. यावेळी उत्कृष्ट वार्तांकनाबद्दल सदाशिव पुकळे व फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल रणजीत सागर यांचा सत्कार करण्यात आला .कार्यक्रमास तालुक्यातील विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी बातमीदार व फोटोग्राफर उपस्थित होते. फोटो ग्रुपवर टाकला आहे. आटपाडी येथे पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात बोलताना सभापती डॉ. भुमिका बेरगळ व्यासपिठावर माजी सभापती हर्षवर्धन देशमुख ,उपसभापती रुपेश कुमार पाटील, जिल्हा परिषद सदस्य मोहन रणदिवे, माणगंगा कारखान्याचे उपाध्यक्ष भगवानराव मोरे, गटविकास अधिकारी मधुकर देशमुख, पोलीस निरीक्षक बजरंग कांबळे पत्रकार सादिक खटिक.

No comments:

Post a Comment

Advertise