पत्रकारिता दिनानिमित्त माळखांबी शाळेत पत्रकारांचा सत्कार. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, January 7, 2020

पत्रकारिता दिनानिमित्त माळखांबी शाळेत पत्रकारांचा सत्कार.



माणदेश एक्सप्रेस न्यूज 
माळशिरस प्रतिनिधी : आज जिल्हा परिषद शाळा माळखांबी येथे पत्रकारिता दिनानिमित्त  दैनिक सकाळ चे पत्रकार श्री.दिनेश माने-देशमुख,दैनिक पुण्य नगरी चे पत्रकार श्री.विजयकुमार देशमुख,दैनिक जनमत चे पत्रकार श्री.विठ्ठल वाघे यांचा सत्कार करण्यात आला. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असतो.प्रत्येक घटनेला न्याय द्यायच काम पत्रकार करत  असतो.त्याचबरोबर शैक्षणिक कार्य समाजापुढे मांडत असतो.अशा या पत्रकारांचा  पत्रकारिता  दिनानिमित्त सत्कार करण्यात आला.
              दैनिक सकाळ चे पत्रकार श्री.दिनेश माने-देशमुख यांचा सत्कार शाळेतील शिक्षक श्री.दत्तात्रय लोखंडे यांनी केला.दैनिक पुण्य नगरी चे पत्रकार श्री.विजयकुमार देशमुख यांचा सत्कार श्री.अशोक पाटील सर यांनी केला त्याचबरोबर दैनिक जनमत चे पत्रकार श्री.विठ्ठल वाघे यांचा सत्कार श्री.दत्तात्रय कांबळे सर यांनी केला.
 यावेळी शाळेतील शिक्षक दत्तात्रय लोखंडे,अशोक पाटील,ज्ञानेश्वर कोष्टी,दत्तात्रय कांबळे,सुनिता पवार,प्रवीण कळसाइत व विष्णू जायभाय उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Advertise