कासणे येथे धम्म परिषद आणि उद्घाटन सोहळा संपन्न. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, January 6, 2020

कासणे येथे धम्म परिषद आणि उद्घाटन सोहळा संपन्न.


भिवंडी प्रतिनिधी 
मिलिंद जाधव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा देह  ६  डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली  हुन  नागपूर व   मुंबईला  डॉ. भदन्त आनंद  कौशल्यायन यांनी आणले. व त्यांच्या देहाची माहिती संपूर्ण ठिकाणी दिली. ज्या नागरिकांना नागपूर येथे धर्मांतरासाठी जाता आले नाही त्या उर्वरित नागरिकांना   डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चितेला साक्षी ठेवून बौद्ध धम्माची दीक्षा डॉ. भदन्त आनंद कौशल्यायन यांनी  दिली असे डॉ. भदन्त आनंद  कौशल्यायन यांच्या ११५ व्या जयंतीनिमित्त दिपंकर विपश्यना मेमोरियल ट्रस्ट द्वारा धम्मराजिक  कासणे ( वासिंद) आणि राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ५ जानेवारी २०२० रोजी  भिवंडी तालुक्यातील कासणे धम्मराजिक महाविहार विपश्यना सेंटर येथे धम्म  परिषद आणि  थायलंड येथून आणलेली  साडेसात फुट असलेली मूर्तीची प्रतिष्ठापना, विद्यालंकार ग्रंथालायाचे उद्घाटन, विपश्यना साधना हॉलचे उद्घाटन, डॉ.भदन्त आनंद कौशल्यायन यांच्या स्तुपाचे भूमिपूजन संघनायक डॉ.भदन्त आनंद महाथेरो, जागेश सोमकुवर, रघुनाथ कारगावकर,  इंदोर डॉ. बी. आर. आंबेडकर विश्वविद्यालयाचे पूर्व कुलगुरू सी. डी. नाईक,  डी. बी. धांडे, दिपंकर विपश्यना मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष भदन्त विनयबोधी महाथेरो यांच्या  हस्ते  करण्यात आले. यावेळी गौतम  बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार  उपस्थित मान्यवरांना सांगण्यात आले. तर डॉ.भदन्त आनंद कौशल्यायन यांच्या शिष्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचे काम केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यावेळी  राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे सहकार्य लाभले.तर यावेळी  ठाणे,रायगड, मुंबई येथून नागरिकांनी कार्यक्रमासाठी  गर्दी केली होती. 

महाराष्ट्र  शासनाच्या वतीने कासणे  विपश्यना सेंटरला पर्यटन स्थळ ' क ' चा  दर्जा देऊन घोषित करण्यात आले आहे. म्हणून अनेक नागरिक या ठिकाणी भेट देत असतात. डॉ. भदन्त आनंद कौशल्यायन त्यांच्या अस्ति कलशावर   स्तूप बांधण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे. तर  विपश्यना सेंटर व बौद्ध भिक्षु सेंटर लवरकच सुरू करण्याचा संकल्प आम्ही  केलेला आहे. असे कासणे ,दिपंकर विपश्यना मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष भदन्त विनयबोधी महाथेरो यांनी बोलतांना सांगितले.

No comments:

Post a Comment

Advertise